इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगला महावितरणचे बुस्टर

नागपूर :- इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी लागणारी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी महावितरणला राज्याची नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महावितरणच्या पुढाकाराने नागपूर परिमंडलात एकूण 65 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. यात महावितरणच्या स्वतःच्या नागपूर शहरातील 6 चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे, याशिवाय नागपूर जिल्ह्यातील 53 आणि वर्धा जिल्ह्यातील 6 खासगी चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे. या स्टेशन्सवर चार्जिंग करणाऱ्या वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे.

नागपूर शहरातील गांधीबाग विभागात कळमना आणि मेयो येथील 33 केव्ही उपकेंद्रात, महाल विभागातील मॉडेल मिल उपकेंद्रात तर सिव्हील लाईन्स विभागातील नारा, एमआरएस आणि बिजलीनगर उपकेंद्र येथे महावितरणची स्वत:ची चार्जिंग स्टेशन्स आहेत. याशिवाय भारत पेट्रोलियमची बाजारगाव, कामठी, टेकाडी, पारशिवनी, बोरगाव, रामटेक, बुटीबोरी, गिंगणा, कामठी रोड येथे. हिंदुस्तान पेट्रोलियमचे सातनवरी, नेरी, कापसी, चिचभवन व भंडारा रोड येथे. याशिवाय टाटा पॉवर, रिलायन्स बीपी मोबिलिटी , नागपूर महानगर पालीका , नांगिया मोटर्स, बुटीबोरी नगर परिषद, वाडी नगर परिषद, जगदंबा देवस्थान कोराडी, सुजलॉन एनर्जी यांचेसह काही खासगी व्यवसायिकांचे चार्जींग स्टेशन्स शहराच्या इतरही भागात आहेत. त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील लक्ष्मी हॉटेल, एसव्हीएल एजी हाऊस, देवगण, हिंगणघाट, नागलवाडी आणि कारंजा एमआयडीसी या भागात खासगी चार्जिंग स्टेशन्स आहेत.

महावितरण ही महाराष्ट्रासाठी विद्युत वाहनांना चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी नोडल एजन्सी आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी महावितरणच्या माध्यमातून चार्जिंग स्टेशन उभारणे अथवा खासगी चार्जिंग स्टेशन उभारणीस मदत करणे, विद्युत वाहनांच्या चार्जिंगसाठी मदत करण्याच्या दृष्टीने मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करणे, विद्युत वाहनांसाठी धोरणात्मक निर्णयास सरकारला मदत करणे अशी विविध कामे महावितरणकडून केली जातात. महावितरणने इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी स्टेशन उभारायचे असेल तर त्यासाठी स्वतंत्र वेबसाईट सुरू केली आहे. तसेच महावितरणच्या ‘पॉवरअप ईव्ही’ या अॅप्लिकेशनचा वापर करून वाहनचालक आपल्या जवळचे चार्जिंग स्टेशन शोधू शकतात तसेच वाहनाच्या चार्जिंगसाठी या मोबाईल ॲपचा वापर करू शकतात.

किफायतशीर प्रवास

विद्युत वाहनांमुळे पर्यावरण रक्षणाला मदत करण्यासोबतच पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होते. पेट्रोलवर चालणाऱ्या पारंपरिक दुचाकी वाहनाला इंधनाचा खर्च प्रति किलोमीटर सुमारे 2 रुपये 14 पैसे येतो तर विद्युत दुचाकीला प्रति किलोमीटर 56 पैसे खर्च येतो. पेट्रोलियम वर चालणाऱ्या चारचाकी वाहनाला प्रति किलोमीटर सुमारे 7 रुपये 60 पैसे खर्च येतो तर विद्युत चारचाकीला प्रति किलोमीटर 1 रुपया 55 पैसे खर्च येतो. तीनचाकी गाडीचा प्रति किलोमीटरचा खर्चही पेट्रोलियम साठी सुमारे 3 रुपये 6 पैसे तर विजेसाठी 62 पैसे आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या चाचार्जीगसाठी आवश्यक सुविधा महावितरणतर्फ़े उपलब्ध करुन देण्यात आली असून खासगी कंपन्या आणि वैयक्तिक ग्राहकाला देखील इलेक्ट्रिक चार्जीग स्टेशन सुरु करता येत असून त्यासाठी लागणारी तांत्रिक मदत महावितरणतर्फ़े केली जात असल्याची माहिती महावितरणच्यातर्फ़े देण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन ची यादी

बुटीबोरी विभाग बुटीबोरी उपविभाग – 6

हिंगणा उपविभाग – 2

एमआयडीसी (1) उपविभाग – 6

सिव्हील लाईन्स विभाग सिव्हील लाईन्स उपविभाग – 4

लष्करीबाग उपविभाग – 2

एमआरएस उपविभाग – 4

कॉग्रेसनगर विभाग हुडकेशवर उपविभाग – 3

रिजंट उपविभाग – 6

शंकरनगर उपविभाग – 3

त्रिमुर्तीनगर उपविभाग – 2

गांधीबाग विभाग वर्धमान उपविभाग – 5

महाल विभाग मानेवाडा उपविभाग – 1

सुभेदार उपविभाग – 1

तुळशीबाग उपविभाग – 3

नागपूर शहर मंडल – 46

काटोल विभाग कोंढाळी ग्रामिण उपविभाग – 2

मौदा विभाग कामठी शहर उपविभाग – 3

कन्हान उपविभाग – 2

मौदा उपविभाग – 2

रामटेक उपविभाग – 2

सावनेर विभाग खापरखेडा उपविभाग – 1

सावनेर उपविभाग – 1

नागपूर ग्रामिण मंडल – 13

आर्वी विभाग कारंजा उपविभाग – 2

हिंगणघाट विभाग हिंगणघाट उपविभाग – 2

वर्धा विभाग देवळी ग्रामिण उपविभाग – 1

वर्धा उपविभाग – 1

वर्धा मंडल – 6

एकूण नागपूर परिमंडल – 65

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Prototype of Neonatal Ventilatory Devices Made in Nagpur to Combat Neonatal Mortality

Sun May 12 , 2024
Nagpur :-Nelson Hospital a 100 bedded Multispecialty Hospital, is creating milestones in the Health caresector with its high end medical services. Nelson Hospital is situated in the heart of the city,equipped with the state-of-the-art facilities, with an advanced Paediatric super specialitydepartment, serving all section of patients with complex health issues in Central India division.On the occasion of Mother’s day, Nelson […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com