सरपंच बालपांडे यांचा पुढाकार
बेला : नवनिर्वाचित सरपंच अरुण देवराव बालपांडे यांनी सरपंचपदी विराजमान होताच गावात स्वच्छतेचा धडाका सुरू केला आहे. ग्रामपंचायत व एकता नाट्य सांस्कृतिक मंडळाच्या सहकार्याने दर रविवारी ही स्वच्छता मोहीम बेला गावात राबविण्यात येत आहे.
काल रविवारला ग्रामपंचायत कार्यालयापासून वार्ड क्रं.२ व स्मशानभूमी पर्यंत स्वच्छता करण्यात आली या कामी बालपांडे सह उपसरपंच प्रशांत लांबट, स्वयंसेविका सविता रोडे, ग्रा.पं. सदस्य योगेश गाते ,शालू लांडे, कल्पना पादाडे ,नीतू आत्राम, हेमलता झगडे ,राजू रोडे ,नाजुका धनकासार ,नितीन बालपांडे, संजय पुरके, सुनीता कावळे ,शीला गंधारे, एकता नाट्य मंडळाचे अशोक नकले, सुनील गावंडे, किशोर बानकर, कार्यकर्ते गुलाबराव गलांडे ,गंगाधर मते, किशोर सोनकुसरे ,कमलाकर वाघाडे, महेश गाते, तुकाराम शिंगारे, नामदेव लामपुसे ,मधुकर खातखेडे, संजय मंदे ,दशरथ झगडे, अनुरूप धांडे ,कौशल बालपांडे, व संपूर्ण ग्रामपंचायत कर्मचारी परिश्रम व सहकार्य केले आहे.
प्रतिक्रिया-
जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. स्वच्छता मिशनमुळेच बेला गावाचा विकास होऊ शकतो. निरोगी नागरिकांमुळे ‘स्वच्छ आनंदी व सुंदर गाव’ घडू शकते. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मी प्रेरणा घेऊन स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. ऐतिहासिक व संतभूमी असणाऱ्या बेलानगरीला गत वैभव मिळविण्यासाठी जनतेने सहकार्य करावे.
अरुण बालपांडे, सरपंच बेला