दारुच्या अतिसेवनामुळे २४ वर्षीय युवकाचा मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- कांद्री बस स्टॉप येथील रहिवासी राजेश क्रि़ष्णराव माने यांचा मुलगा राजकुमार माने या युवकाचा दारुच्या अतिसेवनामुळे मृत्यु झाल्याची धक्का दायक घटना उघडकीस आली आहे.

प्राप्त माहिती नुसार गुरुवार (दि.३०) जुन ला सकाळी ९.३० वाजता दरम्यान मृतक युवकाचे वडील राजेश क्रिष्णराव माने वय ५५ रा. बस स्टाप कांद्री हे आपल्या कामावर जात असतांना त्यांचा मुलगा मृतक राजकुमार राजेश माने वय २४ वर्ष हा घरी झोपला होता. रात्री वडील राजेश घरी आले असता राजकुमार घरी आपल्या खोलीत झोपला होता. दुस ऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता दरम्यान वडीलांनी आपल्या मुलीला राजकुमार याला झोपेतुन उठवायला पाठवले असता मुलगी त्याच्या खोलीतुन ओरडत बाहेर आली. वडिलांनी जाऊन पाहणी केली असता मुलगा राजकुमार मृत अवस्थेत पडला होता. सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णा लय येथे नेण्यात आले. वडील राजेश माने यांचा तक्रा रीवरून कन्हान पोलीसांनी मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नव तप्यात कन्हान ला दिवसरात्र विजेच्या लपंडावाने नागरिक भयंकर त्रस्त

Sun Jun 2 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – महावितरण कंपनीने तासोंतास विज बंद असल्याने ग्राहकांना होणा-या त्रासाची भरपाई द्यावी.  कन्हान :- शहरात मागिल एका महिन्या पासुन या कडक उन्हाळयात आणि नवताप्याच्या उष्ण तापमानात ना वादळ, वारा, पाऊस नसताना कन्हान ला दिवसरात्र वारंवार तासोंतास विधृत पुरवठा खंडीत होत असल्याने येथील नागरिकाना भयंकर त्रास सहन करावा लागत असल्याने संताप व्यकत होत आहे. महावितरण विधृत कंपनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com