कुंभारे कॉलोनीत 21 वर्षीय विवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या.

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी

-आत्महत्येचे केले फेसबुक लाईव्ह

कामठी ता प्र 4 :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी रहिवासी विवाहित तरुणाने घरमंडळीपैकी कुणीही घरी नसल्याचे संधी साधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री दीड दरम्यान घडली असून आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव कृतांक डोंगरे वय 21 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी असे आहे तर या आत्महत्येचे फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण विडिओ करून आत्महत्या केली हे इथं विशेष!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हा विवाहित असून पत्नी ही माहेरी असून आई अनमोल डोंगरे ह्या नातेवाईकाकडे बाहेर गावी गेल्या होत्या तर वडील व भाऊ तसेच बहीण ही नागसेन नगर च्या मूळच्या घरी झोपले असता घरी कुणी नसल्याचे संधी साधून सदर मृतक कृतांक डोंगरे ने अज्ञात कारणावरून कुंभारे कॉलोनी च्या राहत्या घरात फेसबुक लाईव्ह करून दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नसले तरी आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी कामठी च्या श्वविच्छेदनगृहात हलविण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.मृतकाच्या पाठीमागे आई,वडील,पत्नी ,एक लहान भाऊ व एक बहीण असा आप्तपरिवार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आज नागपुरात होणार स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे समापन 

Tue Apr 4 , 2023
नागपूर :- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी अपशब्द काढून आक्षेपार्ह विधान केले. महाराष्ट्राचे सुपूत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टीने सावरकर गौरव यात्रा काढली. या गौरव यात्रेचे समापन  मंगळवार 4 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता नागपुरातील शंकर नगर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com