कन्हान : – जिल्हा परिषद नागपुर अंतर्गत गोंडेगाव-साटक गट जि.प.क्षेत्रातील साटक येथे जि प सदस्य व विरोधी पक्ष उपगटनेता मा. व्यकटेशजी कारेमोरे यांचे शुभ हस्ते आठ लक्ष रुपयांचे विकास कामांचे भुमिपुजन करण्यात आले. जिल्हा परिषद नागपुर विकास काम निधी अंतर्गत गोंडेगाव-साटक जि प च्या ग्राम पंचायत साटक येथील साटक -आमडी रस्त्यावरील ५ लक्ष रूपयांचे पुल बांधकाम व ३ लक्ष रूपयांचे मातीकाम असे एकुण ८ लक्ष रूपयांच्या विकास कामाचे भुमि पुजन जि प सदस्य व विरोधी पक्ष उपगटनेता मा. व्यकटेशजी कारेमोरे यांचे शुभ हस्ते व मा.सितारामजी भारद्वाज, पं स सदस्य नरेश मेश्राम, ग्रा प साटक सरपंचा सौ सिमाताई उकुंडे, उपसरपंच गजानन वांढरे व ग्रा प सदस्य यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले . याप्रसंगी भिमराव वाडीभस्मे, यशवंतराव उकुंडे, मनिराम वाडीभस्मे, गोविंद चोपकर, सतिश वाडीभस्मे, तरूण बर्वे, राजुजी वाडीभस्मे, मधुकरजी ङेंगे, अमोल वाडीभस्मे, कमलेश सुरसे, भोला गुरुपंचांग सह शेतकरी आणि गावकरी आवार्जुन उपस्थित होते.
साटक येथे आठ लक्ष रूपयांच्या विकास कामाचे भुमिपुजन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com