नागपूर :- ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे सहावे उद्यम प्रदर्शन 16 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत आंध्र असोसिएशन, अमृत भवन, सीताबर्डी, नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या भूमिपूजनाचा सोहळा शनिवार, 11 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता संपन्न होणार आहे. हा सोहळा प्रसिद्ध उद्योगपती भगवानजी नारददेलवार यांच्या हस्ते पार पडणार आहे.
ग्रामायण प्रतिष्ठान 2012 पासून ग्रामीण भागातील विविध उपक्रम, पर्यावरणपूरक प्रकल्प आणि सामाजिक सेवेमध्ये सक्रिय आहे. या प्रदर्शनामध्ये ग्रामीण तसेच स्थानिक उत्पादने, सेंद्रिय शेतीच्या वस्तू, पारंपरिक व पर्यावरणपूरक वस्तू, बचत गटांचे उपक्रम आणि स्वनिर्मित वस्तू यांचे प्रदर्शन होणार आहे.
ग्रामीण तसेच स्थानिक उत्पादने, सेंद्रिय शेतीच्या वस्तू, पारंपरिक व पर्यावरण पूरक वस्तू, बचत गटांचे उपक्रम, स्वनिर्मित वस्तू यांचे प्रदर्शन होईल. यात कौशल्य विकास कार्यक्रम, नावीन्यपूर्ण स्पर्धा, CSR आणि दाते यांच्यासोबत जोडणारे उपक्रम राबविण्यात येईल. कला दालनात बांबू आर्ट, गोंडी आर्ट, माती काम, कचऱ्यातून तयार केलेल्या कलाकृती यांचे आकर्षण असेल. याशिवाय ई-वेस्ट कलेक्शनमध्ये जुने कपडे व साड्या गोळा करून त्यापासून पिशव्या तयार केल्या जातात. सरकारी योजनांची माहिती, सरकारी उपक्रमांविषयी जागरूकता निर्माण करणारे स्टॉल्स असणार आहेत.