नागपूर :- रविन्द्रकुमार सिंगल पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांनी दिनांक ११.१२.२०२४ चे १२.०० वा. चे सुमारास पोलीस ठाणे सदर हद्दीतील गड्डीगोदाम पोलीस चौकी येथे अचानक भेट दिली. आयुक्त यांनी चौकीचे निरीक्षण करून चौकीत हजर असलेले पोउपनि. अनिल बोमले व मपोअं. संघदीपा सदावर्ते यांना आवश्यक त्या सुचना दिल्या दरम्यान पोलीस आयुक्त यांनी पोलीस चौकीत आलेल्या नागरीकांशी संवाद साधुन त्यांच्या समस्यांचे समाधान करून निराकरण केले. नागरीकांनी दिलेल्या सुचना व विनंतीवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देवून तेथे हजर आलेल्या पोलीस अधिकारी यांना आदेश दिले. याप्रसंगी पोलीस आयुक्त यांनी गड्डीगोदाम परिसरात पायदळ पेट्रोलींग करून नागरीकांशी संवाद साधला.