नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ३ पोलीसांचे पथक पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत पेट्रोलींग करीत असता, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, त्यांनी आदर्श नगर, हनुमान मंदीर जवळ एक संशयीत वरमैन मोपेड वाहन क. एम.एच ४९ डी. एक्स ५४३१ हो थांबवून, त्यावरील आरोपी क. १) शमीम शकील खान, वय १८ वर्ष, रा. आदर्श नगर, नंदनवन, नागपूर २) प्रतिक राम श्रीवास्तव, वय १८ वर्ष, रा. धनवंतरी नगर, नंदनवन, नागपूर यांची झडती घेतली असता, त्यांचे जवळ एका पांढऱ्या रंगाचे बोरीत शासनाने प्रतीबंधीत केलेला नायलॉन मांजा एकुण ५० चकी विक्री करण्याचे उद्द्देशाने जवळ बाळगुन समश्व मिळुन आले. त्यांचे ताब्यातुन नमुद मुद्देमाल व मोपेड गाडी असा एकुण १,५५,०००/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीचे हे कृत्य कलम ५. १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, सहकलम २२३ भा.न्या.सं. अन्वये होत असल्याने आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाई कामी नंदनवन पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि, मुकुंद ठाकरे व त्यांचे पथकाने केली.