घातकशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- कळमणा पोलीस ठाणे चे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहीती वरून जानकी नगर, माता मंदीरचे बाजुला स्टील कारखान्ऱ्या जवळ सार्वजनिक ठिकानी एका संशयीत ईसमास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव ओमप्रकाश उर्फ झाऊ पुनव लहरे वय २२ वर्ष दोन्ही रा. मिनीमाता नगर, पाच झोपडा, कळमणा, नागपूर असे सांगीतले, त्यांची अंगझडती घेतली असता, त्याचे जवळ एक लोखंडी चाकु किंमती अंदाजे ५००/- रू. चा मिळाल्याने तो जप्त करण्यात आला. आरोपी हा घातक शस्त्र बाळगतांना समक्ष मिळुन आल्याने व त्याने मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने, पोलीस ठाणे कळमणा येथे पोउपनि, राऊत  यांनी आरोपीविरूध्द कलम ४/२५ भा.ह.का., सहकलम १२२, १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

Mon Dec 9 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे तहसिल हद्दीत, वैष्णवी बिल्डींग ४ था माळा, टांगा स्टॅण्ड जवळ, तहसिल, नागपूर येथे राहणारे फिर्यादी मुस्तफा अब्दुल हसन मुल्ला, वय ३८ वर्ष, यांनी त्यांची पेंशन प्लस गाड़ी कं. एम.एच ३१ बी. झेड ५४४६ किंमती ५०,०००/- रू. ची ही बिल्डींग जवळ पार्क करून, लॉक करून, ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्‌याने त्यांची गाडी चोरून नेली. अशा फिर्यादी यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com