प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत नागपूर जिल्हा राज्यात आघाडीवर

नागपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला नागपूर जिल्हात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, नागपूर जिल्ह्यातील एकूण 11,327 वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्या कडील प्रकल्पाची एकूण स्थापित क्षमता तब्बल 46.15 मेगावॅट आहे. या योजनेचा लाभ घेणार-या राज्यातील एकूण ग्राहकांमध्ये नागपूर जिल्ह्यातील तब्बल 18.53 टक्के ग्राहकांचा समावेश आहे.

या योजनेत नागपुर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना 85.67 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर होऊन त्यापैकी 65.42 कोटी रूपयांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वळते करण्यात आले आहे तर ऊर्वरीत लाभार्थ्यांच्या खात्यात हे अनुदान वळते करण्याची प्रक्रीया सुरु आहे.

महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेत विदर्भात महावितरण अंतर्गत नागपूर जिल्ह्याने (11,327) आघाडी घेतली आहे. त्याखालोखाल अमरावती (4,196), अकोला (1,878), वर्धा (1,773) बुलढाणा (1,629), चंद्रपूर (1,343), यवतमाळ (1,336), भंडारा (1,026), गोंदीया (761), वाशिम (599) आणि गडचिरोली (571) यांचा क्रम लागतो. या योजनेत विदर्भातून आतापर्यंत 1,03,935 ग्राहकांनी अर्ज केले असून त्यापैकी 26,439 वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांची एकूण स्थापित क्षमता 106,91 मेगावॅट आहे व त्यांना 205.90 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून त्यापैकी 165.41 कोटी रुपयांच्या अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. याशिवाय विदर्भात 75,729 वीज ग्राहकांकडे ही संयंत्रे लागण्यास सज्ज असून 913 ग्राहकांकडील कामे अंतिम टप्प्यात आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला 30 हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला 60 हजार रुपये व तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला 78 हजार रुपये अनुदान मिळते. एक किलोवॅटच्या सौर यंत्रणेतून दरमहा सुमारे 120 युनिट वीज तयार होते. गरजेपेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीज बिल शून्य होते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरायची, प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीज बिल शून्य येते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते याशिवाय, सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांनाही आर्थिक लाभ होतो.

फेब्रुवारी महिन्यात ही योजना सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत 69,118 वीज ग्राहकांकडे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले आहेत. त्यांची एकूण वीजनिर्मिती क्षमता 273,72 मेगावॅट असून त्यांना 567.93 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले असून त्यापैकी 465.65 कोटी रुपयाचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. याशिवाय, राज्यात आतापर्यंत 3 लाख 8 हजार 901ग्राहकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

ग्राहकाच्या वीज आणि पैसे बचतीसोबतच पर्यावरण पुरक असलेल्या पंतप्रधान सुर्यघर- मुफ्त बिजली योजनेत सहभागी होऊन महावितरणच्या रुफ़ टॉप सोलरचा लाभ अधिकाधिक ग्राहकांनी घेण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे, या योजनेत सहभागी होण्याची संपुर्ण माहिती या संकेतस्थळावर दिलेली असून तेथील अर्ज स्विकृतीनंतर महावितरणच्या https://css.mahadiscom.in/UI/ROOFTOP/PVNewApplication.aspx या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महापरिनिर्वाण दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण

Sun Dec 8 , 2024
कन्हान :- के.डी.के.कॉन्व्हेंट टेकाडी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून महापरिनिर्वाण दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर हयाना आदरांजली अर्पण करण्यात आली. शुक्रवार (दि.६) डीसेंबर ला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वान दिना निमि त्य के.डी.के. कॉन्हेंट टेकाडी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शाळा संचालक अविनाश कांबळे, पत्रकार किशोर वासाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!