नागपूर :-गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार हे आरोपींचे शोधात पेट्रोलींग करीत असता, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, सापळा रचुन पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत विनोभा भावे नगर येथे एका संशयीत ईसमास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव पंकज बंडुजी सतरामवार, वय २४ वर्षे, रा. गल्ली नं. १, विटा भट्टी चौक, यशोधरानगर, नागपुर असे सांगीतले. त्यास अधिक विचारपुस केली असता, त्याने त्याचा साथीदार पाहीजे आरोपी क. २) हर्ष छोटु डेहरीया, रा. शांतीनगर, नागपुर याचेसह संगणमत करून दिनांक ३१.१०.२०२४ चे ११.०० वा. ते १५.०० वा. चे दरम्यान, पोलीस ठाणे हिंगणघाट हद्दीत घरफोडी केल्याचे व त्यातील मुद्देमाल एका ज्वेलर्स ला विक्री केल्याचे सांगीतले, नमुद बाबत खात्री केली असता पोलीस ठाणे हिंगणघाट येथे फिर्यादी सुरेश श्रीरामजी धोंगडे, वय ४७ वर्षे, रा. शाहलंगडी रोड, संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट, जि. वर्धा यांचे तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याबाबत माहीती मिव्यली. आरोपीचे ताब्यातुन सोन्याचे दागीने एकुण किंमती अंदाजे ३५,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस मुद्देमालासह पुढील तपासकामी हिंगणघाट पोलीसांचे ताब्यात दिले.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. राहुल शिरे, पोउपनि, राहुल रोटे, पोहवा, टप्पुलाल चुटे, प्रमोद वावणे, पो. विशाल नागभिडे, देवचंद थोटे व रोशन तांदुळकर यांनी केली.