कन्हान :- आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मि क आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नागपुर व्दारा आयोजित १८ व्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत साई बाबा आश्रमशाळा टेकाडी च्या विद्यार्थीनींनी १४, १७ व १९ वर्षे वयोगटात खेळुन अंतिम सामन्यात विजय श्री प्राप्त केल्याने संघाचे कौतुक करून अ़भिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातंर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नागपुर व्दारे आयोजित १८ व्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा शासकिय आश्रमशाळा लाडगांव ता. काटोल येथे दि.२७ ते २९ नोंव्हेंबर २०२४ या कालावधीत पार पडल्या. व्हॉलीबॉल स्पर्धेत प्राथमिक मुख्याध्यापक प्रफुल्ल बालपांडे यांच्या मार्गदर्शनात साईबाबा आश्रमशाळा टेकाडी येथील विद्यार्थीनींने १४, १७ व १९ वर्षे वयोगटात खेळुन अंतिम सामन्यात आश्रमशाळा उदासा, लाडगाव व कवडस संघाला पराजित करित विजयश्री प्राप्त करून शाळेच्या नावलौकिक केल्या ने शाळेच्या विजयी संघाच्या विद्यार्थीनी, क्रीडा शिक्षक अखिलेश सरोदे यांचे साईबाबा अनुदानित आदिवासी आश्रमशाळा टेकाडी संचालक किशोर वानखेडे, मुख्याध्यापक (माध्य व उच्च) संजय काळे, मुख्याध्यापक (प्राथमिक) प्रफुल्ल बालपांडे, सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी विजयी संघाच्या विद्यार्थ्यीनीचे अभिनंदन करून कौतुक केले.