‘हा तर भाजपाचा कर दहशतवाद’, १,८२३ कोटींची प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाल्यानंतर काँग्रेस संतप्त

नवी दिल्ली :- प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसची चार बँक खाती काही महिन्यांपूर्वी गोठवण्यात आली आहेत. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एकही पैसा खर्च करण्यात येत नाही. आमच्याकडे आज दोन रुपयेही नाहीत, अशी खंत राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखविली होती. त्यानंतर आज प्राप्तिकर विभागाकडून १,८२३ कोटींचा कर भरण्याची नोटीस देण्यात आली. यानंतर काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी कडवी झुंज देऊ नये, यासाठी त्यांना पंगू करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.

“भाजपाकडून कर दहशतवाद केला जात असून निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आर्थिक पंगू करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असा आरोप याच पत्रकार परिषदेत काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी केला. तर भाजपा कर कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप खजिनदार अजय माकन यांनी केला. आम्हाला जो नियम लावला जातोय, तोच जर भाजपाला लावला तर त्यांना ४,६०० कोटींची नोटीस प्राप्तिकर विभागाने द्यायला हवी, असेही अजय माकन म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अमरावतीमध्य्ये नवनीत राणांविरोधात बच्चू कडूंकडून उमेदवाराची घोषणा

Fri Mar 29 , 2024
अमरावती :- लोकसभा मतदारसंघात भाजपकडून नवनीत राणा यांना तिकीट देण्यात आलं होतं. नवनीत राणांविरोधात कोण उभं राहणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. आज बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून नवनीत राणांविरोधात उमेदवाराची घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब यांनी प्रहार पक्षामध्ये प्रवेश केला असून त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. आजचा दिवस भावनिक आहे.आयुष्यातील मोठा निर्णय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights