– म्हणून सत्ता परिवर्तनाची गरज
भंडारा :- महाराष्ट्र राज्यातील ट्रीपल इंजिन असलेल्या महायुतीच्या हिटलर , हुकूमशाही सरकारने ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना केली नाही,लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण दिले नाही,त्यामुळे ओबीसी समाजाचा विकास कोसो दूर आहे. एक संघ असलेल्या एस सी,एस टी समाजाच्या आरक्षणाचे उप वर्गीकरण करून जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा कुटील प्रयत्न केला जात आहे.ओबोसी आरक्षणाचे नाव पुढे करून राज्यातील स्वायत्त संस्थांच्या निवडणुका प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत.एवढेच नव्हे तर धान उत्पादक शेतकरी बांधवांसाठी लाभदायक असलेला स्वामिनाथन आयोग लागू केला नाही,धान पिकाला खर्चावर आधारित हमी भाव देणारी योजना कार्यान्वित केली नाही,त्यामुळे खर्च जास्त उत्पादन कमी आणि हमी भावाची शास्वती नसल्याने शेती तोट्यात जात असून धान उत्पादक शेतकरी बांधव आर्थिक संकटाच्या चक्रव्यूहात सापडले आहेत.
एम आय डी सी क्षेत्रात नवीन उद्योग स्थापन करण्यात आले नाही त्यामुळे भंडारा पवनी तालुक्यात उच्च शिक्षित सुशिक्षित युवक युवतींची मोठी फौज निर्माण झाली असून रोजगारा अभावी त्यांचे लाख मोलाचे जीवन उद्ध्वस्त होत आहे.यास महायुती सरकारचे उपेक्षित धोरण कारणीभूत आहे.भंडारा पवनी क्षेत्राला पितळ हब बनविण्याचे आश्वासन दिले होते ते आश्वासन महायुतीच्या खोकेबाज सत्ताधाऱ्यांना पूर्ण करता आले नाही यावरून महायुती सरकारच्या खोकेबाज सत्ताधाऱ्यांच्या कथनी आणि करणी मध्ये फरक आहे.
महायुतीच्या खोकेबाज सत्ताधाऱ्यांनी भंडारा पवनी तालुक्यात लहान मोठे उद्योग आणणे अपेक्षित होते परंतु महाराष्ट्र राज्या सह भंडारा पवनी विधानसभा मतदार संघाच्या हक्काचे उद्योग गुजरात मध्ये कुणी पळविले त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील जनतेला धोका देऊन गुजरातचे हित साधणाऱ्या ट्रिपल इंजिन असलेल्या महायुतीच्या खोकेबाज लोकप्रतिनिधींना सत्तेत राहण्याचा अधिकार आहे का असा सवाल जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी उपस्थित केला आहे.
महायुतीचे सरकार मोठ मोठे उद्योजक,भांडवलदार ,कारखानदारांचे १६०० कोटींचे कर्ज सरसकट एका क्षणात माफ करते परंतु सुलतानी व अस्मानी संकटात सापडलेल्या साध्या भोळ्या शेतकरी बांधवांचे कर्ज माफ केले जात नाही त्यामुळे महायुतीचे सरकार मोठ मोठ्या भांडवलदार कारखानदारां चे की शेतकरी बंधावांचे असा प्रश्न आवासून उभा ठाकला असून ट्रीपल इंजिन असलेल्या महायुती सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उभे ठाकले आहे.
म्हणून मतदार बांधवांनो सत्ता परिवर्तन करणे काळाची गरज आहे.
यावरून हे ट्रीपल इंजिन असलेले हिटलर शाहीचे सरकार बहुजन समाज तसेच धान उत्पादक शेतकरी विरोधी असून याबाबत भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रातील धान उत्पादक शेतकरी, गोसे प्रकल्प ग्रस्त शेतकरी, शेतमजूर, कामगार, भूमीहीन, सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब,तसेच शोषित पिडीत सुजाण मतदार बांधवांनी सम्यक विचार विनिमय करून मतदानाच्या माध्यमातून महायुतीच्या खोकेबाज लोकप्रतनिधींना सत्तेतून खाली खेचून धडा शिकविण्याची खरी वेळ आली असून यावेळी भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रातील सत्ताधाऱ्यांना सत्तेतून पायउतार कारणअसे आवाहन सर्व सामान्य जनतेचे लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी प्रचार सभे प्रसंगी केले असून भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी माझे चुनाव चिन्ह तुतारी समोरील बटण दाबून मतदान रुपी आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी विनंती नरेंद्र पहाडे यांनी मतदारांना केली आहे.
प्रचार सभे प्रसंगी जनतेचे लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्या सह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी ,कार्यकर्ते तसेच शेतकरी शेतमजूर, कामगार, भूमीहीन, सुशिक्षित बेरोजगार बहुसंख्येने उपस्थित होते.