– फ्रेंडस् को-ऑप. हाऊ. सोसा. सहकार्याने ग्रामायण प्रतिष्ठानचा उपक्रम
– महाराष्ट्रातील सेवा संस्थांच्या कार्याचे निःशुल्क प्रदर्शन नागपुरात प्रथमच !
नागपूर :- फ्रेंडस् को-ऑप. हाऊ. सोसा. सहकार्याने ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने विदर्भ महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या सेवा संस्थांचे काम समाजासमोर आणून त्यांना बळ देणार अभ्युदय सेवा प्रदर्शन नऊ व दहा नोव्हेंबरला नागपूरात प्रथमच होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन तात्या टोपे सभागृह, तात्या टोपे नगर, पश्चिम न्यायालय मार्ग, नागपूर येथे शनिवारी, ९ नोव्हेंबरला सकाळी ११.३० वाजता होणार आहे. एकाच ठिकाणी अनेक संस्थांच्या विविध सामाजिक/सेवा कार्याचे दर्शन होणार असून, सेवावृत्ती कार्यकर्त्यांशी संवादाची संधी उपलब्ध होईल.
उदघाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून सी एस आर, विदर्भ, टीसीएस, नागपूरचे आनंद आकनुरवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधरराव गाडगे, डब्लूसीएल, नागपूरचे सीएसआर/वेलफेअर जनरल मॅनेजर अनिलकुमार सिंग, अमरस्वरूप फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उद्योजक मनिष मेहता, सेवा सदन संस्था, नागपूरच्या सचिव वासंती भागवत, दैनिक हितवादचे मुख्य संपादक विजय फणशीकर, फ्रेंडस् को-ऑप. हाऊ. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश तेंलग, सचिव सुभाष मंडलेकर यांची उपस्थिती राहणार आहे. विदर्भातील निवडक दिवंगत सेवाव्रतींच्या कार्याची सचित्र माहितीही प्रदर्शनात ठेवली जाणार आहे, जेणेकरून नवीन पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल. नागपूरकरांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देऊन समाजात होणाऱ्या विविध सेवा कार्यांची माहिती घ्यावी, असे आवाहन ग्रामायण प्रतिष्ठानने केले आहे.