‘लोकसेवेची पंचसुत्री’ पश्चिम नागपुरात घराघरात पोहचणार

– महालक्ष्मी योजना भगिनींना सोप्या पद्धतीने उपलब्ध करून दिली जाईल

नागपुर :- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर लोकसेवेची पंचसुत्री योजना देण्यात येणर आहे. यातील पहिले आश्वासन महिलांसाठी महालक्ष्मी योजनेची घोषणा काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केली आहे. प्रत्येक भगिनींना 3 हजार मानधन देण्याचा संकल्प करण्यात आले आहे. लोकसेवाभिमुख योजनेचा लाभ पश्चिम नागपुर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक भगिनींना मिळावा याकरिता आता त्यांना घरूनच देण्यात येणार. यापूर्वी महायुतिच्या सरकारच्या फसव्या लाडली बहिण योजनेमुळे अनेक भगिनींना अर्ज भरण्यासाठी भटकंतीसह दलालांकडून आर्थिक शोषणाचा सामना करावा लागला. परंतु, आगामी निवडणुकीत पश्चिम नागपुर विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार विकास ठाकरे पुन्हा विजयी झाल्यानंतर भगिनींना घरातूनच सर्व योजना पोहचविण्याचा काम केले जाणार. याशिवाय बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4 हजार रुपयांपर्यंत मदत सरकारकडून दिली जाणार आहे. भगिनींच्या अर्जासोबत तरुणांचेही अर्ज त्याच प्रमाणे भरले जाणार, अशी माहिती पश्चिम नागपुरचे विद्यमान आमदार, नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिली.

गुरुवारी महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार विकास ठाकरेंच्या जन आशिर्वाद यात्रा दरम्यान नागरिकांना लोकसेवेची पंचसुत्रीचे माहिती देण्यात आली आणि पश्चिम नागपुरचे वचननामाचे वाटप करण्यात आले. प्रामुख्याने महालक्ष्मी योजना महाराष्ट्रात लागू करणार असल्याचा विश्वास भगिनींना देण्यात आले. या योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला 3 हजार देण्यात येणार. तसेच याच योजनेतंर्गत महिला व मुलींसाठी मोफत बस प्रवास दिला जाणार आहे. पश्चिम नागपुरातील प्रत्येक रहिवासीयांच्या कुटुंबाला सुरक्षा मिळावी यासाठी 25 लाखांपर्यंतचा विमा लाभ मिळावा याकरिता विशेष प्रतिनिंधीची नियुक्ती करून सर्व अर्ज भरण्यात येणार. याशिवाय प्रत्येकांना मोफत आरोग्य आणि बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4 हजारांपर्यंत मदत दिली जाणार असल्याचेही नागरिकांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले.

 जन-आशीर्वाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाविकास आघाडीचे पश्चिम नागपुरचे लोकप्रिय उमेदवार विकास ठाकरेंच्या जन-आशीर्वाद यात्रेची सुरुवात गुरुवारी नई बस्ती दरगाह चौकापासून करण्यात आली. सकाळी आठ वाजता परिसरातील प्रमुख देवस्थाळांचे पूजन करून प्रारंभ झालेल्या जन-आशीर्वाद यात्रा पुढे पचमढी मोहल्ला, गोंड मोहल्ला, नई बस्ती मार्गाने गाढे घाट येथे यात्रेचे समापन झाले. यावेळी पश्चिम क्षेत्रातील महिला, पुरुष, तरुण भर उन्हात विकास ठाकरे यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उभे असताना दिसून आले. यावेळी कुणी रांगोळी काढली तर कुणी पुष्पवर्षाव करत त्यांचे स्वागत केले. काही ठिकाणी भगिनींनी स्वागताचे औषण करीत त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. विकासाच्या मुद्दाला सर्वोतपरी घेऊन पश्चिम नागपुरात केलेल्या कामांची पोचपावती जन-आशिर्वाद यात्रेतून पाहयला मिळाली.

तर सायंकाळी पाचच्या दरम्यान जन-आशीर्वाद यात्रेच्या दुसरा टप्पा शितला माता मंदिरातून झाली. शितला मातेचे दर्शन करून प्रारंभ झालेल्या जन-आशीर्वाद यात्रा पुढे- गोंडपुरा, खाटिकपुरा, जवाहर चौक, धोबीपुरा, बुद्ध विहार आजाद चौक, गोलछा मार्गाने छोटा धोबीपुरा, कराची गल्ली, किराडपुरा, दादू की गल्ली, गांधी चौक, तुकाराम चाळ, छोटी मस्जिद, हाकार मोहल्ला, गांधी चौक येथे यात्रेचे समापन झाले. नागिरकांचा उत्स्फूर्त प्रतिसादातून त्यांनी ठाकरे यांना पुन्हा विजय निश्चित असल्याचे यावेळी दाखवून दिले. जन-आशीर्वाद यात्रेत महाविकास आघाडीमधील सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी स्वंयफूर्तीने यात्रेचे जागोजागी जल्लोषात स्वागत करुन विकास ठाकरे यांना विजयाचा आशिर्वाद दिला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

काँग्रेसने रोखला होता शहराचा विकास! - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची टीका

Fri Nov 8 , 2024
– दहा वर्षांत भाजपने नागपूरचा कायापालट केला – पश्चिम, दक्षिण-पश्चिम व उत्तर नागपुरात जाहीर सभाhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 नागपूर :- काँग्रेसच्या नेत्यांनी नागपूर शहराचा विकास रोखून धरला होता. मिहानला विरोध करणारेही काँग्रेसचेच नेते होते. विलास मुत्तेमवार आणि नितीन राऊत यांनीच मिहानच्या विरोधात जोरदार आंदोलन केले होते. आज त्याच मिहानमध्ये मोठ्या कंपन्या आल्या आणि ८८ हजार तरुणांना रोजगार मिळाला. १ लाख कोटींपेक्षा जास्त रुपयांची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com