प्रत्येक स्त्रीने आत्मनिर्भर व्हावे ही काळाची गरज – मुक्ता कोकड्डे

– राष्ट्रीय बालिका दिवस उत्साहात

नागपूर :-  प्रत्येक स्त्रीस पसंतीनूसार शिक्षण मिळाले पाहिजे याची प्रत्येक आई-वडिलांनी काळजी घेतली पाहिजे. जोपर्यंत प्रत्येक मुलगी स्वत: निर्णय घेणार नाही तोपर्यंत ती आत्मनिर्भर होणार नाही, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी येथे केले.

जिल्हा परिषदेच्या माहिला व बालकल्याण विभागांतर्गत राष्ट्रीय बालिका दिवसाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर इनोव्हशन सेंटर येथे आयोजित करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पटेल, अनिरुध्द पाटील, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दामोधर कुमरे, निंबाळकर यावेळी उपस्थित होते.

आजच्या आधूनिक काळात सुध्दा स्त्री शिक्षीत असून तीची पिळवणूक होत आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या माध्यमातून मुलगी सक्षम झाली पाहिजे. सर्व क्षेत्रात मुलींनी प्रगती करावी. पालकांनी मुलंमुली असा भेदभाव न करता सामनतेची वागणूक दिली पाहिजे. स्वयं निर्णय घेवून स्वत:चे मत व्यक्त केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

भ्रृणहत्या, बालविवाहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, त्यावर प्रतिबंध घालणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मुलींची प्रमाण वाढावे यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना शासन राबवित आहे. बालविवाह विरोधात जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासन कठोर कार्यवाही करीत आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी सांगितले. ज्या महिला घरकामाच्या व्यापात असल्यामुळे पुढील शिक्षण घेऊ शकल्या नाहीत. त्यांच्यासाठी नयी किरण योजना लागू करण्यात आली असून बचत गटाच्या अनेक महिला आपले दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहेत, असे त्या म्हणाल्या. अजूनही अशा महिला असल्यास त्यांना मुळ प्रवाहात आणणार असल्याचे सांगून मुलीमुलात भेदभाव न करता पालकांनी मुलींना प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आणण्यासाठी प्रयत्नरत रहावे. यासाठी सामाजिक प्रोत्साहन महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

पहिल्या सत्रात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण व अनिरुध्द पाटील यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रमासह बालविवाह, भ्रृणहत्या, गर्भलिंग निदान आदीवर पथनाट्य सादर करण्यात आली.

जिल्हा परिषद शाळेतून दहावी व बारावीमध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थींनी सोबतच नयी किरण अंतर्गत बचत गटातील दहावी पास झालेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. प्राविण्यप्राप्त दिव्यांग विद्यार्थींनीचा सत्कार करण्यात आला. लेक लाडकी योजनेंतर्गत बालक पालकांचा सत्कारही करण्यात आला.

दोन सत्रात पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील विद्यार्थिंनी व मुली तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

NewsToday24x7

Next Post

प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिवसाची प्रशासनाची तयारी

Thu Jan 25 , 2024
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कस्तुरचंद पार्कवर ध्वजवंदन नागपूर :- भारतीय प्रजासत्ताकाचा 74 वा वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. 26 जानेवारीला सकाळी ठीक सव्वा नऊ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कस्तुरचंद पार्क मैदानावर ध्वजवंदन कार्यक्रम होणार आहे. कस्तुरचंद पार्क येथे यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. मान्यवरांना निमंत्रण पाठविण्यात आले असून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com