निवडणूक निरीक्षक यांची आरमोरी विधानसभा मतदान केंद्रांची पाहणी

गडचिरोली :- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे अनुषंगाने निवडणूक निरीक्षक (सामान्य), विनीतकुमार यांनी 05 नोव्हेंबर 2024 रोजी 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील विसोरा येथील मतदान केंद्र क्रमांक 101, 102, 103 व 104 तसेच देसाईगंज येथील महिला (पिंक) मतदान केंद्र क्रमांक 132 (नैनपूर वार्ड) तसेच दिव्यांग मतदान केंद्र क्रमांक 125 इत्यादी मतदान केंद्रांनी भेटी देऊन मतदान केंद्रांची पाहाणी केली व त्या ठिकाणी असलेल्या सोयी सुविधाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच त्रुटींबाबत मार्गदर्शन करुन सदर त्रुटी दुर करणेबाबत निर्देश दिले.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी, 67- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी मानसी, उपविभागीय अधिकारी कुरखेडा, रणजीत यादव, निवडणूक निरीक्षक (सामान्य) यांचे संपर्क अधिकारी ए.के.बकालिया, नायब तहसिलदार, विलास तुपट, निवडणूक महसुल सहायक महेंद्र मेहर प्रामुख्याने उपस्थित होते. असे स्विप व मीडिया नोडल अधिकारी, देसाईगंज श्रीमती प्रणाली खोचरे यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत जिल्हा महिला व बाल विकास विभागाचा अनोखा उपक्रम

Fri Nov 8 , 2024
गडचिरोली :-‘दिवाळीतील एक दिवस बालकांसोबत’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बालगृहातील निराधार बालकांसोबत काल दीपावली उत्सव साजरा केला. महिला व बाल विकास विभागा अंतर्गंत जिल्ह्याच्या ठिकाणी काळजी व संरक्षणाची गरज असलेली, अनाथ, निराधार, निराश्रीत, विधी संघर्षग्रस्त, बालकांकरिता बालगृह व निरिक्षणगृह कार्यान्वित आहेत. अशा बालकांसोबत दिवाळी उत्सव साजरा करुन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याकरिता महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com