विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ – आचारसंहिता भंगाच्या २८१९ तक्रारी निकाली,२८१ कोटी ७८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण २८३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २८१९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

२८१ कोटी ७८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण २८१ कोटी ७८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाखांहून अधिक मतदान केंद्र

Thu Nov 7 , 2024
मुंबई :- विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात 1 लाख 427 मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्टीकोनातून राज्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात 8 हजार 462 मतदान केंद्र आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर येथे 7 हजार 579, ठाणे – 6 हजार 955, नाशिक – 4 हजार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com