बसपा चे बाबासाहेबांना अभिवादन व बसपाचा स्थापना दिन संपन्न

नागपूर :-संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त व बसपाच्या 40 व्या स्थापना दिन निमित्ताने कही हम भूल न जाये अंतर्गत नागपूर जिल्हा व शहर बसपा च्या वतीने संविधान चौकात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बसपाचा 40 वा स्थापना दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी बसपाचे नागपूर लोकसभेचे उमेदवार योगेश लांजेवार व रामटेक लोकसभाचे उमेदवार संदीप मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. या दोघांनीही आपापल्या क्षेत्रातील जनतेला आंबेडकर जयंतीच्या व बसपा स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा देत देत दुपारी एक वाजता संविधान चौकात एकत्र आले.

याप्रसंगी बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, विदर्भ झोन इन्चार्ज पृथ्वी शेडे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, विलास सोमकुवर, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, जिल्हा सचिव अभिलेष वाहने, जिल्हा बीव्हीएफ राम गोनेकर, माजी महासचिव नागोराव जयकर, माझी मनपा पक्ष नेते जितेंद्र घोडेस्वार, गौतम पाटील, महिला नेत्या सुरेखा डोंगरे, शहराध्यक्ष प्रकाश गजभिये, महासचीव चंद्रशेखर कांबळे, तसेच धम्मपाल गोंगले, भास्कर कांबळे, जगदीश गजभिये, नितीन वंजारी, अभय डोंगरे आदी विधानसभा अध्यक्ष, जिल्हा, शहर, विधानसभा आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा राजभवन येथे शुभारंभ

Mon Apr 15 , 2024
– मुंबई अग्निशमन दलाच्या ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक प्रदान – अग्निशमन दलाने ड्रोन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अंगिकारावे – राज्यपाल रमेश बैस मुंबई :- स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढली असून पूर्वीपेक्षा अनेक बहुमजली इमारती शहरात निर्माण होत आहेत. अनेक देशात अग्निशमन कार्यात ड्रोन तंत्रज्ञान वापरले जाते, तसेच आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान आपल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com