अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर होणार कारवाई

– अधिकृत स्थळांवरच व्हावी फटाके विक्री – मनपा आयुक्तांचे आदेश

चंद्रपूर  :- येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे निश्चित केलेल्या अधिकृत ठिकाणीच स्टॉल्स लावण्याचे व फटाक्यांची विक्री करण्याचे निर्देश मनपाद्वारे दिले गेले असुन अनधिकृत स्थळांवरून फटाके विक्री केल्यास प्रसंगी दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

मनपातर्फे कोहिनुर तलाव व मुल रोडवरील कुंभार सोसायटी ग्राऊंड ही स्थाने फटाके विक्री करण्याची दुकाने लावण्यास निश्चित करण्यात आली आहेत. जनहित याचिका क्र. 152 / 2015 मध्ये मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाके विक्रेत्यांनी विस्फोटक व अधिनियम 1884 आणि त्या अंतर्गत केलेले विस्फोटक नियम 2008 मधील प्रतिबंध व नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे यासाठी फटाके स्टॉल्सच्या उभारणीत नियमांची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी पथके गठीत करण्यात आली आहे.

परवानगी नअसलेल्या ठिकाणांहुन फटाके विक्री करणे हा कायद्याने गुन्हा असुन अश्या प्रसंगी दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. बंदी असलेले फटाक्यांची विक्री करता येणार नसुन परवानगी असलेले फटाके महानगरपालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेऊनच विक्री करावयाची आहे. तसेच फटाके विक्री असलेल्या जागी आतिशबाजी करण्यास मनाई आहे.

भारत सरकार अधिसूचना क्रमांक जी.एस.आर. 682(ई), दि. 05/10/1999 अन्वये 125 डेसिबल (एआय) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणा-या फटाक्यांचे उत्पादन, विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बेरियम सॉल्ट, लिथीयम, अर्सेनिक, लीड, मर्क्युरी यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे. या घटकांमुळे विषारी वायू तयार होतात आणि हे वायू प्राणी व वनस्पती या दोघांना घातक आहेत.त्यामुळे शक्यतो हरित दिवाळीच साजरी करावी व फटाके फोडायचे असल्यास सायंकाळी ७ ते १० दरम्यानच फोडण्याचे तसेच ज्या फटाक्यांवर ग्रीन फटाके असल्याचे नमुद असेल तेच फटाके घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकवर्गणीतून जमा चिल्लरने भरला उमेदवारी अर्ज

Tue Oct 29 , 2024
– सामान्य युवकाला नागरिकांचा साथ भंडारा :- राज्यातील विधानसभा निवडणूकीचा डंका वाजला असून दिनांक २२ ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. अनेक मोठया पक्षांनी देखील पक्षाचे अर्ज भरण्याकरीता लोकांची गर्दी व वाहनांचा ताफा दाखविला. प्रत्येक पक्ष हा स्वत:कडे मोठया प्रमाणात लोकांची साथ असल्याचे भासवत आहे. परंतु भंडारा विधानसभा क्षेत्रातील सामाजीक क्षेत्रात १५ वर्षापासून कार्य करणार्‍या एका गरीब युवकाला भंडार्‍यातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com