तुमचा लवकरच दाभोळकर होणार ; शरद पवारांना सोशल मिडियावर धमकी ;राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक ;खासदार सुप्रिया सुळे आणि शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट…

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी आल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

शरद पवार यांना ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी सोशल मिडियावर विशेषतः फेसबुकवर देण्यात आली आहे. ही गंभीर बाब लक्षात आल्यावर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी सोशल मिडियावर आलेल्या त्या धमकीच्या स्क्रीन शॉटची झेरॉक्स पोलीस आयुक्तांना देण्यात आली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या समवेत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खैरी ग्रामपंचायत तर्फे शिवराज्यभिषेक दिन सोहळा

Fri Jun 9 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या खैरी ग्रामपंचायत कार्यालय येथे गुढी उभारून शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने ग्रामपंचायत खैरीचे सरपंच योगिता किशोर धांडे,उपसरपंच राम ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य धर्मराज आदमने,अमोल सोनेकर, बेबीनंदा बंड, पदमश्री ठाकरे, मेघा पाटील, त्रिशिला नगरारे ,ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, उच्च प्राथमिक शाळा खैरी येथील शिक्षक वृंद, आरोग्य उपकेंद्र येथील कर्मचारी मदतनीस व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights