1993 च्या तुकडीचे एजीएमयुटी केडरचे सनदी अधिकारी विक्रम देव दत्त यांनी कोळसा सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला

नवी दिल्ली :- विक्रम देव दत्त यांनी आज कोळसा मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला. अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश (एजीएमयुटी) कॅडरचे 1993 च्या तुकडीचे सनदी अधिकारी, विक्रम देव दत्त यांनी यापूर्वी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) महासंचालक म्हणून काम केले आहे.

याआधीचे कोळसा मंत्रालयाचे सचिव व्ही.एल. कांथा राव यांच्या जागी दत्त यांनी पदभार स्वीकारला असून, कांथा राव सध्या खाण मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे कोळसा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. तर राव यांच्या आधी अमृत लाल मीना कोळसा मंत्रालयाचे सचिव होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बेल्ज‍ियमचे आर्थिक शिष्टमंडळ मुंबई दौऱ्यावर येणार : बेल्ज‍ियम वाणिज्यदूतांची माहिती

Mon Oct 21 , 2024
– हिऱ्यांशिवाय लॉजिस्टिक्स, उत्पादन व आरोग्य सेवा क्षेत्रात सहकार्य वाढवणार मुंबई :- बेल्ज‍ियमचे राजे फिलिप यांच्या भगिनी असलेल्या प्रिन्सेस ऍस्ट्रिड यांच्या नेतृत्वाखाली बेल्जीयम येथील व्यापार – उद्योजकांचे आर्थिक शिष्टमंडळ (बेल्ज‍ियन इकॉनॉमिक मिशन) येत्या मार्च महिन्यात भारत भेटीवर येणार आहेत. यावेळी मिशनचे सदस्य दिल्लीसह मुंबईला भेट देणार असल्याची माहिती बेल्ज‍ियमचे मुंबईतील वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकेंस यांनी आज येथे दिली. वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकेंस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com