मुंबई :- राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज दादर मुंबई येथील स्वामीनारायण मंदिरास भेट देऊन तेथील नीलकंठ वर्णी यांचे दर्शन घेतले व अभिषेक केला.
राज्यपालांनी अक्षर पुरुषोत्तम भगवान, स्वामी नारायण भगवान, हरिकृष्ण महाराज व इतर देवतांचे दर्शन घेतले.
यावेळी राज्यपालांनी योगी सभागृह येथे प्रगट ब्रह्मस्वरूप महंत स्वामी महाराजांचे आशीर्वाद घेतले तसेच उपस्थित भक्तांशी संवाद साधला. यावेळी साधू तीर्थस्वरूप दास व साधू निष्काम जीवन उपस्थित होते.