बसपा ने निशुल्क पुस्तके वितरित केली

नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 68 व्या वर्धापन दिना निमित्ताने दीक्षाभूमीवर बहुजन समाज पार्टीने बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला दीक्षाभूमीवर दिलेले भाषण तसेच मायावतींनी धम्मदीक्षेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 14 ऑक्टोंबर 2006 ला नागपुरात दिलेले भाषण यांची 5 हजार संयुक्त पुस्तिका तसेच लहान मुलांच्या शालेय वस्तू दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना निशुल्क वितरीत करण्यात आली.

याप्रसंगी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, बसपाचे माजी मंत्री यशवंत निकोसे, जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार, जिल्हा प्रभारी रंजना ढोरे, राजकुमार बोरकर, माजी जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, माजी जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, अनोमदर्शी भैसारे (वर्धा), महासचिव चंद्रशेखर कांबळे, मिलिंद वासनिक, महिला नेत्या सुनंदा नितनवरे, अभिलेष वाहाने, सुशील वासनिक (चंद्रपूर), युवानेते सदानंद जामगडे, अंकित थुल, सचिन मानवटकर, प्रवीण पाटील, भानुदास ढोरे, वर्षा सहारे, नितीन वंजारी, अरुण शेवडे, जगदीश गेडाम, प्रकाश फुले, वीरेंद्र कापसे, बालचंद्र जगताप, मनोज गजभीये, राकेश सहारे, कुणाल शेवडे, विद्यार्थी शेवडे, प्रिया कांबळे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बसपाच्या स्टालला आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, यूपी, एमपी, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा, दिल्ली आदि राज्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात भेटी दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तीन दिवसात दहा हजार बांधवांनी घेतली धम्मदीक्षा

Mon Oct 14 , 2024
– जपानच्या चाळीस अनुयायांचा समावेश नागपूर :- पवित्र दीक्षाभूमीवर गुरुवारपासून धम्मदीक्षा सोहळ्याला सुरुवात झाली. १० ते १२ ऑक्टोबर या तीन दिवसात जवळपास दहा हजार बांधवांनी धम्मदीक्षा घेतली. यात जापानच्या चाळीस अनुयायांचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती, दीक्षाभूमीच्या वतीने पवित्र दीक्षाभूमी येथे ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन कार्यक्रमा दरम्यान गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे सलग तीन दिवस धम्मदीक्षा देण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com