कोदामेंढी :- दिनांक २५/९/२०२४ लां मौदा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत येसंबा तर्फे २५१५ अंतर्गत भूमिगत नालीचा शासकीय कामाला शासकीय जागेवर अतिक्रमण करणारे गावातीलच परसराम शेंडे व त्यांची पत्नी विरोध करत असल्यामुळे सरपंचा सोनू इरपाते, उपसरपंच धनराज हारोडे , ग्रामपंचायत सदस्य देवानंद गजभिये, सदस्या करिश्मा पानतावणे, सदस्या वर्षा महल्ले यांनी मौदा तहसिदार धनंजय देशमुख यांना निवेदन दिले.
याबाबत तहसीलदारांनी कारवाई करण्याचे आदेश पारित केले असून उद्या दिनांक 3 आक्टोंबर गुरुवारला येसंबा येथील तलाठी शासकीय जागेवरील अतिक्रमण काढून भूमिगत नालीचे कामाला गती देणार असल्याचे भ्रमणध्वनी वरून उपसरपंच हारोडे यांनी सांगितले.