पाटण येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व मल्हारपेठ येथील ग्रामसचिवलयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

मुंबई :-पाटण येथील केंद्र पुरस्कृत अमृत २.० नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व मल्हारपेठ येथील लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालयाचे नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे उपस्थित होते.

या पाणीपुरवठा योजनेची मूळ किंमत 16 कोटी 25 लाख 56 हजार इतकी आहे. या कामाला 23 फेब्रुवारी 2024 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. या पाणीपुरवठा योजनेमुळे 135 लिटर दरडोई पाणी देण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर असून या योजनेअंतर्गत 110 मिमी ते 250 मिमी व्यासाची 38.964 किमी. पाईपलाईन असणार आहे. तर 4,442 घरगुती नळ जोडण्या आहेत. या पाणीपुरवठा योजनेचे पाटण शहरवासीयांना मुबलक व शुद्ध पाणी मिळणार आहे. याचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.

मल्हारपेठ येथील ग्रामपंचायत मालकीची तीन मजली इमारत 2001 मध्ये बांधण्यात आली होती. या जुन्या इमारतीवर जन सुविधा योजनेतून 50 लाख खर्चून ग्रामसचिवलयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

या सुसज्ज ग्रामसचिवालयामुळे मल्हारपेठ ग्रामस्थांना विविध सुविधा मिळणार आहेत. याचेही लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, नगरपंचायतीचे प्रशासक संतोष मोरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विकासात्मक कामांबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमानही उंचावण्याचा प्रयत्न - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mon Sep 30 , 2024
– बांधकाम कामगारांना सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप नागपूर :- राज्य सरकारने सातत्याने सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत. हे सरकार लोकाभिमुख काम करीत आहे. एकीकडे आपण विकासाची गती कायम राखली असून दुसरीकडे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारच्या अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. विकास कामांबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमानही उंचावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com