‘निम्न वर्धा प्रकल्पातून होणार 505 मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती’

Ø उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

Ø ‘महानिर्मिती’ व ‘सतलज जल विद्युत निगम लिमिटेड’यांचा संयुक्त प्रकल्प

नागपूर :- निम्न वर्धा प्रकल्पावर उभारण्यात येणाऱ्या ५०५ मेगावॅट क्षमतेच्या तरंगता सौरऊर्जा प्रकल्प विकासासाठी राज्य शासनाच्या ‘महानिर्मिती आणि केंद्र शासनाच्या ‘सतलज जल विद्युत निगम लिमिटेड’(एसजेविएनलि.) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

यावेळी ‘महानिर्मिती’ आणि ‘एसजेविएनलि’ तसेच जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वर्धा जिल्ह्यातील स्थानिक क्षेत्राच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या या प्रकल्पामुळे जवळपास १४०० व्यक्तींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.

निम्न (लोअर) वर्धा प्रकल्प हा वर्धा जिल्ह्यातील आर्वी जवळील वरुड-धानोडी येथील वर्धा नदीवर असून यावर प्रस्तावित असलेल्या तरंगता सौरऊर्जा प्रकल्पाकरिता महानिर्मितीने पूर्ण व्यवहार्यता सर्वेक्षण केले. या प्रकल्पासाठी जवळपास ७३२ हेक्टर जलक्षेत्राची निवड केली जाणार आहे. तर विकासकामांसाठी जवळपास ३०३० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून जवळपास १०५१.२८ दशलक्ष युनिट्स वार्षिक हरित ऊर्जा निर्मिती होणार आहे. ३६ महिन्यांमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

तरंगता सौरऊर्जा प्रकल्पामुळे राज्यात सौरऊर्जा निर्मितीला चालना मिळेल आणि नूतनीकरण योग्य बंध (आरपीओ) पूर्ण करण्यास मदत मिळेल. सौर प्रकल्प स्थापित क्षमतेचे आणि निर्मितीचे समतुल्य उत्सर्जन टाळून कार्बन उत्सर्जन कमी करण्यास हा प्रकल्प सहाय्यभूत ठरेल.

या प्रकल्पाच्या माध्यमातून पारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी महाग जीवाश्म इंधन खरेदी टाळता येईल तसेच वार्षिक जवळपास ८,६२,०४९ कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन टन कमी होईल. वार्षिक जवळपास ८,४९,४३४ कोळशाचाही वापर टनाने कमी करण्याकरिता मदत मिळणार आहे. ४९/५१ अश्या समभागाने या प्रकल्पाकरिता ‘सतलज जल विद्युत निगम लिमिटेड’ आणि ‘महानिर्मिती’ यांच्यामध्ये करार करण्यात आलेला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्व-रचित काव्य प्रतियोगिता आयोजित

Fri Sep 27 , 2024
नागपुर :- WCL में राजभाषा पखवाड़ा-2024 के अंतर्गत आज मुख्यालय के कार्मिकों के लिए स्व-रचित काव्य प्रतियोगिता का आयोजन किया गया जिसमें अधिकारियों-कर्मचारियों ने स्व-रचित कविता से समां बांध दिया । कल्याण सभागृह में आयोजित प्रतियोगिता में निर्णायक के रूप में वरिष्ठ पत्रकार एवं साहित्यकार डॉ. प्रवीण डबली उपस्थित रहे । साथ ही प्रतियोगिता संयोजक/निर्णायक की भूमिका समीर बारला, मुख्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com