रेती चोरी करणाऱ्या आरोपींना अटक

कामठी :- पोलीस ठाणे नविन कामठी ह‌द्दीत, उमगांव जवळने कन्हान नदीचे पात्रालगत असलेल्या उमगांव-सोनेगांव रोडवर याठिकाणी दिनांक २१.०९.२०२४ चे २३.४५ वा. चे सुमारास, आरोपी १) गणेश ईश्वर शेंडे, वय २७ वर्षे, रा. उमगावं, कामठी २) लंकेश ज्ञानेश्वर शेंडे, वय ३१ वर्षे, रा. सोनेगाव राजा, कामठी, ३) आकाश भाऊराव कांबळे, वय ३१ वर्षे, रा. सोनेगाव राजा, कामठी हे त्यांचे १) ट्रक क. एम.एच. ३५ ए. जी. ०४८६ २) ट्रॅक्टर क. एम.एच. ४०, सि. ए, ५७५९ व ३) टाटा कंपनीचा ट्रक क. एम. एच. ३१ सि. क्यु, ६५७७ मध्ये स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता कन्हान नदीचे पात्रातुन अवैधरित्या रेती चोरी करताना फिर्यादी यांना समक्ष मिळून आले, आरोपींना ताब्यात घेवून त्यांना कायदेशिर कागदपत्राची विचारणा केली असता, त्याचे जवळ कोणताही पुरावा नसल्याचे सांगीतले. आरोपीचे ताब्यातुन दोन ट्रक, एक ट्रॅक्टर, रेती भरण्याकरीता लागणारे साहीत्य, दोन मोबाईल फोन व रेती असा एकुण २०१७,०००/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी फिर्यादी पोहवा. विलास देवगडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे नविन कामठी येथे सपोनि. सचिन यादव यांनी आरोपीविरूध्द कलम ३०३(२), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी क. १ ते ३ यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चोरी करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Mon Sep 23 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे कळमना हद्दीत प्लॉट नं. ४१. विजय नगर, कळमना, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी लत्ता लिलाधरराव ठोसर, वय ६० वर्षे, हया त्यांने आपले घरी घराला दरवाजा लोदुन झोपले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे उघड्‌या दारातुन प्रवेश करून, लोखंडी आलमारीतील रोख ३५,०००/- रु. व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण किंमती अंदाजे १,३५,७००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com