वडिला पाठोपाठ मुलीचा अपघाती मृत्यु..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 21:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी रहिवासी परिसरातील पाटील कुटुंबियातील अस्थिव्यंग्याच्या झटक्याने ग्रस्त वडिलाचा नैसर्गिक मृत्यू होण्याच्या घटनेला 15 दिवसाचा काळ लोटत नाही तोच नागपूर ला नर्सिंग चे शिक्षण घेत असलेल्या 20 वर्षीय मुलीचा नागपूर ला दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली असून वडिलापाठोपाठ मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आकांक्षा शेखर पाटील वय 20 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक मुलगी ही दुचाकी क्र एम एच 31 ई सी 9232 ने मित्रासोबत डबलसीट पारडी पोलीस स्टेशन हद्दीतून जात असताना दुचाकी टिप्पर अपघातात सदर मुलगी खाली पडली व तिच्या अंगावरून भरधाव टिप्पर गेल्याने या दुर्दैवी अपघातात सदर जख्मि मुलीचा जागीच मृत्यु झाला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन केले व कामठीत सदर मृतक मुलीचे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने पाटील कुटुंबियांसह कुंभारे कॉलोनीत शोककळा पसरली आहे.मृतक मुलीच्या पश्चात आई,एक बहीण व एक भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Next Post

शौर्य यात्रेचे रणाळ्यात जंगी स्वागत..

Sun Jan 21 , 2024
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 21: वीर बजरंगी सेवा संस्था महाल नागपूरच्या वतीने नागपूर ते रामटेक गड मंदिर मोटार सायकल शौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शौर्य यात्रेचे कामठी तालुक्यातील रनाळा पंकज मंगल कार्यालय चौकात ढोल ताशे पताका, बँड, डीजे, फटाक्याच्या आतिषबाजीने जंगी स्वागत करण्यात आले.याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर यांचे हस्ते भगवान श्रीराम, लक्ष्मण व सीता यांची पूजा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com