पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेमध्ये सहभागी व्हा-तहसीलदार अक्षय पोयाम

– संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 23:- भारत निवडणूक आयोगाने सन 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिननिमित्त ‘माझे मत माझे भविष्य एका मताचे सामर्थ्य ‘ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली आहे.या स्पर्धेसाठी 15 मार्च 2022 पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.तेव्हा भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन कामठीचे तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केले आहे.
‘माझे मत माझे भविष्य एका मताचे सामर्थ्य’या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत पाच प्रकारच्या स्पर्धा आहेत यामध्ये प्रश्नमंजुषा , घोषवाक्य, गीत गायन, व्हिडीओ मेकिंग आणि भित्तिचित्र स्पर्धा यांचा समावेश आहे.प्रश्नमंजुषा स्पर्धेद्वारे निवडणुकी बाबतची जागरूकता पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.स्पर्धकांनी तपशीलावर मार्गदर्शन तत्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ http://ecisveep.nic.in/contest/येथे भेट द्यावी .प्रवेशिका सर्व तपशिलासह voter contest@eci.gov.inयेथे ई मेल करावी.ई मेल करताना स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा .प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी.सर्व प्रवेशिका 15 मार्च 2022 पर्यंत सहभागी स्पर्धकांच्या तपशिलासह voter-contest@eci.gov.in या इमेल वर पाठविण्यात याव्यात असे भारत निवडणूक आयोगाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
स्वीप कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित करून भारत निवडणूक आयोग सामान्य लोकांच्या प्रतिभा आणि सर्जनशिलतेचा वापर लोकशाही बळकट करण्यासाठी करीत आहे.यामध्ये सर्व वयोगटांना सहभागी होता येणार आहे.सामूहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्व विशद कारण्याच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित कल्पना व मजकुरांचा गौरव करणे असा यामागील उद्देश असल्याचे मत तहसिलदार अक्षय पोयाम यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कोयला की कमी से गहराता जा रहा है देश में बिजली का संकट

Wed Feb 23 , 2022
-टेकचंद शास्त्री नागपुर – महाराष्ट्र राज्य के 7 बिजली केंद्र सहित देश की 71 सरकारी विद्युत परियोजनाओं में कोयला की कमी की वज़ह से बिजली उत्पादन में वृद्धि के वजाय गिरावटें आने के आसार नजर आ रहे हैं। कोयले की भारी कमी से जूझ रहा है महाराष्ट्र के थर्मल प्लांट में सिर्फ चार दिनो का कोयला बचा है। कोयले के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!