– मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार कठोर कारवाई
नागपूर :- नागपूर शहरात स्वच्छतेच्या संदर्भात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने स्वच्छता कार्यात हयगय करणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी नागपूर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेतला आहे. मंगळवारी (ता.१०) घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे करण्यात आलेल्या आकस्मिक पाहणीत विना परवानगी गैरहजर आढळलेल्या ३९ सफाई कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
शहरातील विविध भागात स्वच्छतेबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी (ता.९) लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमध्ये भेट देउन पाहणी केली होती. यावेळी त्यांनी कामात हलगर्जी करणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईबाबत विभागाला सक्त निर्देश दिले होते. मंगळवारी (ता.१०) करण्यात आलेल्या आकस्मिक पाहणीमध्ये एका वरीष्ठ स्वास्थ निरीक्षकासह तीन मलवाहक जमादार, एक प्रभारी जमादार व ३४ सफाई कामगार विना परवानगी गैरहजर असल्याचे आढळून आले. या सर्वांवर मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांचे विरुद्ध विभागीय चौकशी आदेश देण्यात आले आहेत. आयुक्तांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह दहाही झोनच्या सहायक आयुक्तांद्वारे आकस्मिक पाहणी करण्यात येत आहे.
निलंबित सफाई कर्मचारी
वरिष्ठ स्वास्थ निरीक्षक – धर्मेश सिरसवान (लक्ष्मीनगर झोन), मलवाहक जमादार राहुल रामटेके (नेहरूनगर झोन), स्वच्छता जमादार – अतुल सिरकीया (गांधीबाग झोन), स्वप्नील मोटघरे (सतरंजीपुरा झोन), प्रभारी स्वच्छता जमादार- ओमप्रकाश हाथीपछेल (गांधीबाग झोन),
स्थायी सफाई कामगार – शरद गजभिये (लक्ष्मीनगर झोन), संदीप जुगेल (लक्ष्मीनगर झोन), विशाल बाबुलाल गवळी, गवरी, गौरी (धरमपेठ झोन), लखन नन्हेट (धरमपेठ झोन), नेहा महातो (धरमपेठ झोन), सुरज महातो (हनुमान नगर झोन), प्रकाश शिपाई (हनुमान नगर झोन), सोनू बक्सरे (हनुमान नगर झोन), मो. नवाज हनीफ जमाल (धंतोली झोन), वतन महातो (धंतोली झोन), कमल बछेले (धंतोली झोन), येल्लुमलाई शेट्टीया (नेहरूनगर झोन), सुनीता जुगेल (गांधीबाग झोन), राज अमरसिंग करिहार (गांधीबाग झोन), राज गौरे (गांधीबाग झोन), विनोद करिहार (सतरंजीपुरा झोन), धम्मज्योती भिमटे (लकडगंज झोन), गौरी पसेरकर (लकडगंज झोन), कपिश शिव (आशीनगर झोन), साजन बक्सरे (मंगळवारी झोन), इंद्रसेन वैद्य (मंगळवारी झोन)
अधिसंख्य सफाई कामगार – मनोज मरसकोल्हे (धरमपेठ झोन), रंजीता महाजन (धरमपेठ झोन), विनोद हुमणे (हनुमान नगर झोन), राधा हजारे (नेहरूनगर झोन), अरुण साखरे (गांधीबाग झोन), सतीश शेवते (आशीनगर झोन), राजपाल लौंगबरसे (आशीनगर झोन), राजा बक्सरे (मंगळवारी झोन)
सफाई कामगार – विक्की राजेंद्र खरे (गांधीबाग झोन), योगेश गौरे (गांधीबाग झोन), उमेश नक्के (लकडगंज झोन), विनोद तांबे (लकडगंज झोन), रिषभ बक्सरीया (मंगळवारी झोन).