सह पोलीस आयुक्त, नागपुर शहर यांचा बदली कार्यमुक्त समारंभ संपन्न

नागपूर :- पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे आदेशाने नागपूर शहरातील सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांची बदली विशेष पोलीस महानिरीक्षक महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई या पदावर झालेली होती. आज दिनांक ०९.०९.२०२४ चे १२.३० वा. चे सुमारास पोलीस भवन ऑडीटोरीयम हॉल येथे आयोजीत कार्यक्रमामध्ये रविन्द्र सिंगल पोलीस आयुक्त नागपूर शहर यांचे हस्ते पुष्परोपटे देवून निरोप देण्यात आला.

पोलीस आयुक्त यांनी सह पोलीस आयुक्त यांचे अभिनंदन करून त्यांनी नागपुरात केलेल्या कार्यांची प्रसंशा करून त्यांना पुढील कार्यकाळा करीता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अपर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे, पोलीस उप आयुक्त अर्चित चांडक, शशीकांत सातव यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त करतांना सह पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनात आलेल्या अनुभवाचे कथन करून त्यांचे कार्यांची प्रसंशा केली.

अश्वती दोरजे, सह पोलीस आयुक्त यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना त्यांनी नागपूरातील कार्यकाळात केलेल्या कार्या बाबत समाधान व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. कार्यकमाचे सुत्रसंचलन नरेन्द्र हिवरे सहा. पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी केले.  सह पोलीस आयुक्त, नागपुर शहर या पदाचा अतिरीक्त कार्यभार  संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) यांना सोपविण्यात आला.

याप्रसंगी संजय पाटील, प्रमोद शेवाळे अपर पोलीस आयुक्त नागपूर शहर, निमीत गोयल, निकेतन कदम, राहुल मदने,  अर्चित चांडक, शशीकांत सातव, राहुल माकणीकर, अश्विनी पाटील,श्वेता खेडकर तसेच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

Tue Sep 10 , 2024
नागपूर :- फिर्यादी संजीव केवलराव भारसागडे वय ५३ वर्ष रा. कुंभार टोळी, नंदनवन, नागपूर हे एन.एम.सी नेहरू नगर झोन येथे सफाई कामगार असल्याने, ते पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत शितला माता मंदीर समोरून आपले कर्तव्यावर जात असता त्यांच्या ओळखीच्या ज्योती अनु‌वठे हया भेटल्या व त्यांनी पतीला फोन करायचा आहे तुमचा फोन दया असे म्हणून फिर्यादीचे फोनवरून कॉल डायल करून फोनवर बोलत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com