बुट्टीबोरी :- अंतर्गत मौजा वाय पॉईंट नागपूर वर्धा रोड येथे दिनांक ०८.०९.२०२४ चे ०८.०० वा. दरम्यान बुट्टीबोरी पोलीस पथक पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन बुट्टीबोरी पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करुन अशोक लेलैंड दोस्त गाडी क्र. एम.एच ४९ ए.टी. ३२०७ क्रमांकाच्या वाहनास थांबवुन तपासले असता सदर वाहनात आरोपी क. १) अजिम सलीम अंसारी वय २८ वर्ष रा मोतीबाग अस्लम किराणा स्टोअर्स जवळ बेझनबाग नागपुीर २) निशान अब्दुल गणी कुरैशी वय ३३ वर्ष रा. मोमीनपुरा अंसार नगर अंसार मस्जीद जफर किराणाजवळ नागपुर ३) कार्तीक पुणाराम नागवंशी वय ६० वर्ष रा. आंबेडकर नगर जि. गोंदिया ह. मु. मोमीनपुरा अंसाद नगर अंसार मस्जीद नागपुर यांच्या ताब्यातुन दोन मोठया गायी एक काळया रंगाची, दुसरी लाल काळया रंगाची तसेच एक लाल रंगाची लहान गाय व तसेच तीन बछडे तिन्ही लाल रंगाचे तसेच एक गोरा काळा रंगाचा असे ०७ जनावरे किंमती अंदाजे ६०,०००/- रू त्याचे पाय, तोंड व सिगे बांधलेली कोंबुन दिसुन आली तसेच गाडी क्र. एम. एच ४९/ए.टी. ३२०७ अंदाजे किंमती १०,००,०००/- रू असा एकूण १०,६०,०००/- रू. चा अवैद्यरित्या विनापरवाना कोंबुन, निर्देयतेने वागणुक देवून पाण्याची व चान्याची सोय न करता वाहतुक करतांनी मिळून आल्याने आरोपी क. १ ते ३ यांचे कडून जप्त करण्यात आलेला आहे.
सदर प्रकरणी सरकार तर्फे फिर्यादी नामे रूद्रजी भोजराज पटले वय ३१ वर्ष रा. सातगाव कन्हाळगाव यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. वुट्टीबोरी येथे वरील आरोपीतांविरुध्द कलम ११(१) (जी), ११(१) (सी), प्रा. छ. प्र. अधि. सह कलम ५, अ, ९ अ, म.प.स.१८४ मोवाका. काद्ययान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील आरोपीतांना सुचनापत्रावर सोडण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास पोहवा अरूण कावळे हे करीत आहे. सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे बुट्टीबोरी येथील ठाणेदार पोनि प्रतापराव भोसले, पोहवा अरूण कावळे, पोअं अमोल मांढरे यांनी पार पाडली.