– ओवेसी भाजपचेच सहकारी
नागपूर :- हिमाचल आणि गुजरात या दोन राज्यातील निवडणुका जाहीर झाल्या असून काँग्रेसच्या स्थितीबद्दल बोलताना मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग म्हणाले की, काँग्रेसची स्थिती सध्या मजबूत आहे. आप स्पर्धेत कुठेही नाही तर एमआयएमचे ओवेसी हे भाजपचेच सहकारी आहेत.
काँग्रेस सेवादलचे सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांचे भारत जोडो यात्रेदरम्यान ८ नोव्हेंबर रोजी नांदेडच्या देगलूर येथे यात्रेदरम्यान हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी दिग्विजय सिंह नागपुरात कृष्णकुमार पांडे यांच्या निवासस्थानी आले असता पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान राजीव गांधी यांच्या मारेकर्याना सोडण्याचा निर्णय कोर्टाने दिला यावर बोलताना ते म्हणाले की, स्व. राजीव गांधी यांच्या मारेक:यांना सोडणे म्हणजेच फारच शर्मेशी बाब आहे.
दिग्विजय सिंह यांनी कृष्णकुमार पांडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. कृष्णकुमार पांडे यांचे वडील केदारनाथ पांडे, भाऊ अनिल पांडे, मनोज पांडे, मुलगा शिलज पांडे, निरजरत्न पांडे, पुतण्या अनिरुद्ध पांडे, अभिषेक पांडे यांच्याशी हितगुज केली व सांत्वन केले. सेवा दलातील कार्याची प्रसंशा करीत भारत जोडो यात्रेदरम्यान के. के. पांडे शहीद झाले हा इतिहास कायम कोरला जाईल असेही ते म्हणाले.
नंतर स्व. कृष्णकुमार पांडे यांच्या तौलचित्राला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले की, डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती भक्कम आहे. काँग्रेसचा विजय निश्चित आहे. या स्पर्धेत ‘आप कुठेही दिसत नाही, फक्त प्रपोगंडा आहे. एमआयएमचे ओवेसी हे भाजपचेच एक प्रतिनिधी असून ते भाजपचे सहकारी आहेत, असा आरोप त्यांनी केला.
तत्पूर्वी वैशालीनगर चौक ते स्व. पांडे यांच्या निवासस्थान दरम्यान सेवा दलचे प्रविण आग्रे यांच्या नेतृत्वात दिग्विजय सिंह यांच्यासह सेवा दलाच्या शेकडो कार्यकर्ते पथमार्च काढला. याप्रसंगी काँग्रेस सेवा दलचे मोहम्मद कलामभाई, दिल्ली सेवादलचे बलराम भदोरिया, प्रवीण आग्रे, रामगोविंद खोब्रागडे, अर्जुन सिंह परिहार, अशोक सिंह चौहाण, मुन्ना पटेल, बंडोपंत टेंभूर्णे, किशोर जिचकर, कमलेश चौधरी, सतीश पाली, आसिफ शेख, पंकज सावरकर, खुशाल हेडाऊ, माजी नगरसेवक दिनेश यादव, मिलिंद सोनटक्के, निशाद इंदूरकर, कुणाल चौधरी, प्रणयसिंग ठाकूर, रौणक नांदगावे, हर्ष बरडे, तुषार नंदागवळी, आनद तिवारी, निखिल सहारे, वशीम ख़ान, दानीश अल्ली, अनिल वाघ, राकेश वैद्य, राजेंद्र भोंडे, राकेश वैद्य, प्रवीण आश्रय, सुनील अग्रवाल रामचंद्र भागवतकर, मुन्ना पटेल, ताज अहमद, सिद्धार्थ जोशी, अरुण वराडे, विजय दौड़ा, नर्मदा उके, स्मिता कुंभारे, कल्पना बाथरे, रेखा वाघमारे, विधलता उके, निखिल वानखेड़े, सौरभ काळमेघ, राजरत्न रामटेके, प्रवीण कड़वे, दयाशंकर शाहू, जैनुअल ओवेश, उज्वल खापर्डे, पीयूष सोनकुसरे, क्षितिज साखरे, पारस गजभिये, नैकित दहिकर, मिथीलेश राजपांडे, रॉयल गेडाम, विद्यासागर त्रिपाठी, वैभव त्रिपाठी, चेतन मेश्राम यांच्यासह सेवादल, काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.