अमृत- इंडो जर्मन टूल रूम (छत्रपती संभाजीनगर) या संस्थांमध्ये सामंजस्य करार

– रुपये 70 हजार पर्यन्तचे मोफत अभ्यासक्रम उपलब्ध

– 20 सप्टेंबर २०२४ पर्यन्त अर्ज करावे.

नवी मुंबई :- खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकतील ज्या जातीना कोणत्याही शासकीय विभाग संस्था महामंडळ याच्या योजनेचा लाभ मिळत नाही. अश्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील 18 ते 40 वयोगटातील पात्रताधारक युवक युवतींसाठी इंडो जर्मन टूल रूम (आय.जी.टी.आर.) ने महाराष्ट्र सशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या संस्थेसोबत केलेल्या सामंजस्य करारानुसार अमृत संस्थेकडून इंडो जर्मन टूल रूम (छत्रपती संभाजीनगर) च्या माध्यमातून प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना सहाय्य केले जाणार आहे. इच्छुक पात्रता धारक उमेदवारानी दिनांक 20 सप्टेंबर २०२४ पर्यन्त अमृतच्या www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर अर्ज करावे. अशी माहिती अमृत, पुणेच्या निबंधक डॉ. प्रिया देशपांडे यांनी दिली आहे.

इंडो जर्मन टूल रूम (छत्रपती संभाजीनगर) या लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्द्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या भारत सरकारच्या नावाजलेल्या प्रशिक्षण संस्थेत उद्द्योगासाठी आवश्यक असलेले तात्रिक प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अमृत संस्थेच्या लक्षित गटातील उमेदवारांना उत्कृष्ट दर्जाचे निवासी तसेच अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून, या प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च (प्रशिक्षण, राहणे व जेवण) अमृत, पुणे या सस्थेमार्फत करण्यात येणार.

राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकतील ज्या जातींना कोणत्याही शासकीय विभाग संस्था महामंडळ यांच्या योजनेचा लाभ मिळत नाही. अश्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील 18 ते 40 वयोगटातील पात्रताधारक युवक युवती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत 15 निवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम तसेच 30 अनिवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम हे आय.जी.टी.आर. (छत्रपती संभाजीनगर) संस्थेच्या छत्रपती सभाजीनगर, वाळूज, पुणे, नागपूर, कोल्हापूर, अश्या उपकेंद्रात दिले जाईल. १० वी पास तसेच आय.टी.आय /पदविका/पदवी उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार या योजनेसाठी अर्ज करू शकतात. इच्छूक उमेदवारांचा महाराष्ट्र राज्यात अधिवास असणे अनिवार्य आहे. याबाबत सविस्तर माहिती www.mahaamrut.org.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

उद्द्योगाभिमुख रोजगाराच्या आणि स्वयरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन स्वावलंबनाला चालना देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. अमृतच्या लक्षित गटातील युवक युवतींनी या योजनेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

10 सप्टेंबर रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत

Wed Sep 4 , 2024
नवी मुंबई :- कोंकण विभागातील पेन्शन अदालत दरमहा दुसऱ्या मंगळवारी आयोजित करण्यात येते. या महिन्यातील विभागीय पेन्शन अदालत मंगळवार दि. 10 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वा. कोकण भवनातील कक्ष क्र. 106 सामान्य प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय कोंकण भवन येथे आयोजित केली आहे. सदर पेन्शन अदालतीमध्ये महसूल विभागातील सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पेन्शन प्रकरणांच्या अडचणींचे निवारण करण्यात येणार आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!