उत्तम भविष्य घडविण्याची संधी आपल्या हाती – अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

– मनपा ‘सुपर-७५’ विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गाचा शुभारंभ

नागपूर :- शिक्षणाच्या माध्यमातून अनेक चांगल्या संधी विद्यार्थ्यांपुढे उपलब्ध होतात. शिक्षण हा चांगल्या भविष्याचा पाया आहे. शिक्षण आपल्याला आपले भविष्य घडविण्याची आणि जीवनात यशस्वी होण्याची संधी प्रदान करते. आपले भविष्य उत्तम घडविण्याची संधी आपल्याचा हाती आहे. इयत्ता ९वी ते १२वी या चार वर्षात योग्यरित्या मेहनत केल्यास पुढील संपूर्ण आयुष्य हे आनंददायी ठरते. असे प्रोत्साहनपर मार्गदर्शन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले.

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनीयर वकील, लष्करात अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या’ सुपर ७५ ‘योजने अंतर्गत नवीन शैक्षणीक वर्ष सन २०२४ मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या शिकवणी वर्गाचा शुभारंभ शनिवारी(ता: २४) मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.

मनपाच्या नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळा, फुल मार्केट सीताबर्डी येथे आयोजित छोटेखानी समारंभात मनपाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, सहायक शिक्षणाधिकारी सुभाष उपासे, सुपर ७५ चे संयोजक प्रशांत टेंभुर्णे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सुपर७५ मध्ये निवड झालेले विद्यार्थी, पालक प्रामुख्याने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी सांगितले की, नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभा आहे, योग्यरित्या मेहनत केल्यास हे विद्यार्थी पुढेचालून उत्तम डॉक्टर, वकील, शिक्षक, आयएएस अधिकारी होऊ शकतात. आपले भविष्य घडविण्याची संधीही आपल्याच हाती आहे. त्यामुळे विद्यार्थांनी योग्यरित्या मेहनत करावी, महानगरपालिकेने सुरू केलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचे सोने करावे, आपले पुढचे यश हेच आपली ओळख बनविणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मेहनतीसोबतच आत्मविश्वासाने ही वाट सुकर करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा शब्दांत मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तसेच पालकांनी देखील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अधिक प्रवृत्त करीत शिकवणीला नियमित पाठवावे असे आवाहनही गोयल यांनी केले.

तर मार्गदर्शन करीत शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनी सांगितले की, ‘सुपर ७५’ योजने अंतर्गत सन २०२४ करिता मनपा शाळेतील ८ व्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेवुन ७५ हुशार व होतकरू विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. नागपूर खाजगी शिकवणी वर्ग संघटना यांचे सहकार्याने ‘सुपर ७५’ ही योजना सुरू करण्यात आली व सन २०२१ पासुन या योजनेकरीता निवड झालेल्या हुशार व होतकरु विद्यार्थ्यांना मनपाच्या नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळा फुल मार्केट, सीताबर्डी, नागपूर या शाळेत शनिवार आणि रविवार खाजगी शिकवणी वर्ग संघटनेच्या मार्गदर्शका कडून या विद्यार्थ्यांना फाऊंडेशन कोर्स शिकविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन प्रशांत टेंभुर्णे यांनी केले तर आभार शिक्षिका लक्ष्मी पचारे यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Mahagenco's Sakri-1 25MW Solar Power Project Commissioned Generated Solar Power will be sold in Open market

Sat Aug 24 , 2024
– Now Mahagenco’s Total Solar installed capacity is 428 MW Mumbai :- Mahagenco has undertaken the construction of a Solar power project with a total capacity of 70 MW at Shivajinagar, Sakri Taluka in Dhule District which include, Sakri-1 (25 MW), Sakri-2 (25 MW) and Sakri-3 (20 MW). Out of these, the construction of a 25 MW Solar power plant […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com