‘दिलखुलास’मध्ये अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची मुलाखत

मुंबई :- ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ अमरावती जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत मुलाखत प्रसारित होणार आहे. अमरावती जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

अमरावती जिल्ह्यात निवडणुकीचे कामकाज सुरळित होण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, सर्व घटकातील मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा याबाबत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी माहिती दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विशेष लेख - लोकशाही जपण्यासाठी मतदान केलेच पाहिजे

Wed Apr 24 , 2024
भारताच्या स्वातंत्र्यानंतर सर्व भारतीय महिला आणि पुरुष दोघांना एकाचवेळी मतदानाचा हक्क मिळाला.भारतीय लोकशाहीतील ही गोष्ट युरोपियन आणि अमेरिकन देशांपेक्षा अधिक प्रगल्भ मानली गेली. कारण युरोपियन-अमेरिकन देशात महिला, कामगार, स्थलांतरितांना मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष करावा लागला होता. अमेरिकेतील महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी 144 वर्षे लागली. ब्रिटनमधल्या महिलांना हा हक्क मिळायला 100 वर्षे वाट पाहावी लागली. स्विर्त्झलँड मधील महिलांना मत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com