कामठी फार्मसी महाविद्यालय राष्ट्रीय रॅंकींग-२०२४ मध्ये विदर्भात अव्वल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालय व विद्यापीठे यांचे नॅशनल इंस्टिट्युट रॅंकींग फ्रेमवर्क तर्फे इंडीया रॅंकींग ठरविण्यात येते. यावर्षी दि. १२ आगस्ट २०२४ ला मा. श्री धर्मेन्द्र प्रधान, शिक्षण मंत्री भारत सरकार यांनी घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय रॅंकींग २०२४ मध्ये फार्मसी खाजगी महाविद्यालयातून नामांकित महाविद्यालयामध्ये श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठी या एकमेव महाविद्यालयाचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे मागील सतत ८ वर्षापासून हा बहुमान प्राप्त करणारे कामठी फार्मसी महाविद्यालय एकमेव ठरलेले आहे.

मध्य भारतातील औषधीनिर्माणशास्त्र क्षेत्रात अग्रगण्य असलेले श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठी हे महाविद्यालय शैक्षणिक तसेच संशोधनात्मक कार्याकरीता एक नामांकीत संस्था असुन संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याात NBA, NAAC तसेच NIRF असलेले एकमेव महाविद्यालय आहे.

यावर्षी नॅशनल इंस्टिट्युट रॅंकींग फ्रेमवर्क तर्फे देशातील सर्व विद्यापीठ तसेच अभियांत्रीकी, व्यवस्थापन व औषधीनिर्माणशास्त्र महाविद्यालयांचे रॅंकींग ठरविण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात आले होते. राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठ व महाविद्यालयांचा रॅंकींग ठरवितांनी शैक्षणिक, संशोधन, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, रोजगाराच्या संधी, जनसामान्यांचे मत इत्यादी घटकांच्या समावेश करण्यात आला.

सोमवारी दुपारी जाहिर झालेल्या यादीत संपूर्ण भारतातील विविध विद्याशाखेतून नामांकिंत महाविद्यालयांची निवड यादी घोषित करण्यात आली. सदर यादीत भारतातून औषधीनिर्माणशास्त्र शाखेत श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठी ने ६१ वे स्थान पटकाविले असून संपूर्ण विदर्भातून खाजगी फार्मसी महाविद्यालयांमध्ये एकमेव नामांकित राहण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी ६८ वे स्थान असतांना यावर्षी महाविद्यालयाची गुणवत्ता उंचावून ६१ व्या स्थानावर आल्याचा बहुमान मिळाला.

कामठी फार्मसी महाविद्यालयाने अव्वल स्थान प्राप्त केल्याबद्यल प्राचार्य डॉ मिलींद उमेकर यांनी आनंद व्यक्त केला. याकरीता संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती किशोरीताई भोयर, सचिव श्री सुरेश भोयर यांच्या योग्य मार्गदर्शनात महाविद्यालयातील जेष्ठ प्राध्यापक वृंद, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, पालकवर्ग तसेच विद्यार्थ्यांचे विषेश आभार व्यक्त केले.

याप्रसंगी त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगती, संशोधन व रोजगाराच्या संधीबद्यल महाविद्यालयाला मागील ८ वर्षापासून श्रेणी प्राप्त झालेले एकमेव महाविद्यालय असल्याचे सांगीतले. या यशस्वीतेकरीता महाविद्यालयाचे रॅंकींग प्रकल्पाचे संयोजक डॉ ब्रिजेश ताकसांडे, सर्व प्राध्यापक वृंद तसेच पालक आणि विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलींद उमेकर यांनी अभिनंदन केले.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुजा थाली सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Tue Aug 13 , 2024
नागपूर :- श्रावणाच्या निमित्ताने काळे वाडा महाल इथे पुजा थाली सजावट स्पर्धा घेण्यात आली. सगळयाच महिलानी खूप छान थाली सजवुन आणली होती,या स्पध्रेत प्रथम क्रमांक प्रज्ञा काळे,द्वितीय क्रमांक शुंभागी काळे,तृतीय क्रमांक कल्पना काळे यांचं आला,परिक्षण साधना चेङगे यांनी केलं. यात भाग घेणारया महिला होत्या नंदा काळे,स्वाती काळे,आरती काळे, अंजली काळे,संचालन पल्लवी मुलमुले यांनी केलं,आभार गीता काळे यांनी केले.  https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4Follow […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com