नवी दिल्ली :- केरळमध्ये वायनाड आणि त्याच्या जवळच्या भागात 9 ऑगस्ट 2024 रोजी नैसर्गिक भूकंपाची कोणतेही नोंद नसल्याचं राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्राने म्हटलं आहे. केरळ राज्यात स्थापन केलेल्या भूकंप शास्त्र स्थानकांनी अशा प्रकारची कोणतीही नोंद केली नसल्याचं या केंद्राने म्हटलं आहे.
घर्षण उर्जेमुळे भूगर्भात ध्वनी कंपने निर्माण होऊन परिणामी झालेल्या भूस्खलनामुळे अस्थिर झालेले डोंगरांवरील दगड स्थिरता मिळवण्याच्या प्रयत्नात एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर कोसळल्यामुळे माध्यमांनी ज्याबद्दल माहिती दिली आहे आहे तशा प्रकारची कंपने जाणवली असावीत.
ही ऊर्जा कित्येक पट वाढून भूस्तराखाली असलेल्या भेगांमधून तसंच भूपृष्ठावर असलेल्या दुभंगांशी संबंधित विभाजनातून शेकडो किलोमीटरपर्यंत जाणवू शकते. भूस्खलनप्रवण प्रदेशात ही ऊर्जा गडगडाटी आवाजासह भूप्रदेशात कंपनं निर्माण करून नैसर्गिक घटनेसमान भासू शकते.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितल्या राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्राशी संबंधित राष्ट्रीय भूकंप शास्त्र नेटवर्क या संस्थेने काल कोणत्याही प्रकारच्या भूकंपाची नोंद केली नसल्यामुळे भूपृष्ठाखाली कंपने जाणवणे आणि जमिनीतून येणारे गडगडाटी आवाज यापासून कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याचे कारण नाही.