श्री शिव नित्य पुजन समिती तर्फे १००० दिवसांची संकल्प पुर्ती‌ निमित्त विशेष पुजन संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची संपूर्ण कामठी शहरात एकमेव असलेली मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौक गोयल टाॅकीज जवळ कामठी येथे असून परिसरात घाणीचे साम्राज्याने व अतिक्रमणाने व्यापलेले होते. महाराजांच्या मूर्तीची रोज नित्य पणे स्वच्छता व्हावी व परिसराला नीटनेटके स्वरूप प्राप्त व्हावे या उदात्त हेतूने दररोज कोणतेही खंड न पडू देता नित्य पणे पूजन करण्याचे व सामुहिक शिवस्तुती करण्याचे शिवधनुष्य श्री शिव नित्यपूजन समिती तर्फे उचलण्यात आले. काहीही झाले तरी कोणत्याही परिस्थितीत रोज सकाळी ९ वाजता महाराजाचे पुजन करण्याचा निर्णय नित्य पुजन समिती द्वारे घेण्यात आला. तेव्हा पासून आजपर्यंत सतत हे नित्य पुजन सुरू आहे. त्याला आज ९ अगस्ट २०२४ ला १००० दिवस पुर्ण झाले. त्या निमित्ताने महाराजांचे विशेष पुजन कामठी नगराचे संघचालक मुकेश चकोले व समितीचे संयोजक अनिल गंडाईत, आकाश  भोगे, सोनु नेवारे, अल्केश लांजेवार, देवेंद्र पिल्ले, व समीतीचे इतर सदस्य अक्षय तालेवार, महेश सावरकर, चंदण वर्णन, प्रमोद चकोले, कृणान रधंई, पवन शिंदे, ग्यानचंद कायरवार, हिमांशू भूरे , प्रशांत श्रावणकर ,अथर्व पिंगळे, आशिष यादव, अनिल साहू, रितेश नेवारे, पारस यादव, हिमांशू काटरपवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ‌याप्रसंगी युवा चेतना मंच तर्फे श्री शिव नित्य पुजन समिती च्या सदस्यांना स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित पुस्तक भेट देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मयुर गुरव, प्रा.पराग सपाटे, हितेश बावनकुळे, संदीप यादव प्रामुख्याने उपस्थित होते ‌.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

युवकांसाठी योजनादूत एक सुवर्णसंधी

Fri Aug 9 , 2024
सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम, विकासकामे यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी, शहरापासून गावपातळीवरील तळागाळापर्यंत, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत त्या योजनांची, उपक्रमांची अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!