संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची संपूर्ण कामठी शहरात एकमेव असलेली मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौक गोयल टाॅकीज जवळ कामठी येथे असून परिसरात घाणीचे साम्राज्याने व अतिक्रमणाने व्यापलेले होते. महाराजांच्या मूर्तीची रोज नित्य पणे स्वच्छता व्हावी व परिसराला नीटनेटके स्वरूप प्राप्त व्हावे या उदात्त हेतूने दररोज कोणतेही खंड न पडू देता नित्य पणे पूजन करण्याचे व सामुहिक शिवस्तुती करण्याचे शिवधनुष्य श्री शिव नित्यपूजन समिती तर्फे उचलण्यात आले. काहीही झाले तरी कोणत्याही परिस्थितीत रोज सकाळी ९ वाजता महाराजाचे पुजन करण्याचा निर्णय नित्य पुजन समिती द्वारे घेण्यात आला. तेव्हा पासून आजपर्यंत सतत हे नित्य पुजन सुरू आहे. त्याला आज ९ अगस्ट २०२४ ला १००० दिवस पुर्ण झाले. त्या निमित्ताने महाराजांचे विशेष पुजन कामठी नगराचे संघचालक मुकेश चकोले व समितीचे संयोजक अनिल गंडाईत, आकाश भोगे, सोनु नेवारे, अल्केश लांजेवार, देवेंद्र पिल्ले, व समीतीचे इतर सदस्य अक्षय तालेवार, महेश सावरकर, चंदण वर्णन, प्रमोद चकोले, कृणान रधंई, पवन शिंदे, ग्यानचंद कायरवार, हिमांशू भूरे , प्रशांत श्रावणकर ,अथर्व पिंगळे, आशिष यादव, अनिल साहू, रितेश नेवारे, पारस यादव, हिमांशू काटरपवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी युवा चेतना मंच तर्फे श्री शिव नित्य पुजन समिती च्या सदस्यांना स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित पुस्तक भेट देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मयुर गुरव, प्रा.पराग सपाटे, हितेश बावनकुळे, संदीप यादव प्रामुख्याने उपस्थित होते .