जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणार जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव

▪️12 व 13 ऑगस्ट रोजी दिवसभर आयोजन

▪️कुंजरु, पाथरी, करटोली, कुरडु राजभाज्यांसह मिळणार हंगामी फळे

नागपूर :- जिल्ह्यातील जैवविविधता व राजभाज्या याचे आकर्षण निसर्गाशी जवळीकता साधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असते. रानभाज्या या केवळ आहार आणि चवीशीच निगडीत नसून अनेक औषधी गुणतत्वे राजभाज्यांमध्ये दडलेली असून पिढ्यांपिढया पासून याच्या सेवनाला आपण अधिक महत्व देतो. प्रत्येकापर्यंत हा रानमेवा उपलब्ध व्हावा व शेतकरी गटांना या रानभाज्यांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचण्याची संधी मिळावी याउद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

दिनांक 12 व 13 ऑगस्ट असे दोन दिवस हा महोत्सव सिव्हिल लाईन्स, जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात संपन्न होणार आहे. या महोत्सवासाठी 20 स्टॉल्सची व्यवस्था केली जात असल्याची माहिती आत्माच्या प्रकल्प संचालिका डॉ. अर्चना कडू दिली आहे. या रानभाजी महोत्सवात केना, कुंजरु, खापरखुटी, पाथरी, कपाळफोडी, टाकळा/तरोटा, मायाळू भाजी, कुरडुची भाजी, शेवळा, करटोली, काटेमाठ, हादगा, दिंडा भाजी, शेवगा, अघाडा, कमळून भाजी, आंबाडी भाजी, तसेच हंगामी फळे येथे ग्राहकांना मिळतील. जास्तीत जास्त नागपुरकरांनी याचा लाभ घेऊन शेतकरी गटांना अप्रत्यक्ष मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पक्षांनी केंद्रस्तरावर प्रतिनिधी नेमून मतदार वाढविण्यासाठी सहकार्य करावे - डॉ.पंकज आशिया

Thu Aug 8 , 2024
Ø जिल्हाधिकाऱ्यांची राजकीय पक्षांसोबत बैठक Ø जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध Ø 20 ऑगस्टपर्यंत आक्षेप, हरकती स्वीकारणार यवतमाळ :- लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. मतदानाच्या प्रक्रियेत प्रत्येकास सहभागी करून घेण्यासाठी नावे मतदार यादीत असणे गरजेचे आहे. राजकीय पक्षांनी बुथस्तरावर प्रतिनिधी नियुक्त करून नोंदणी वाढविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले. जिल्ह्याची प्रारुप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!