नितीन लिल्हारे
मोहाडी : महाराष्ट्र राज्यात एकुण ३६ जिल्हे असुन, प्रत्येक जिल्ह्या मधुन दर सहा वर्षांनी विधान परिषद सदस्याची निवडणूक
घेण्यात येते. सदर निवडणुकीत प्रत्येक जिल्हयातील जिल्हा परिषद सदस्य, तालुक्यातील पंचायत समिती सभापती तसेच जिल्हयातील नगर परिषद, नगर पंचायत सदस्य यांना सदर निवडणुकीत मतदान करण्याचे अधिकार देण्यात आला आहे.
जिल्हयातील जिल्हा परिषद सदस्य हे जवळपास १८ हजार ते २० हजार लोकसंख्या असलेल्या त्यांचा क्षेत्रातुन सदस्य निवडुन येतात. तसेच तालुक्यातील पंचायत समिती सदस्य हे ८ ते १० हजार मतदार असलेल्या क्षेत्रातुन निवडुन येतात. तसेच जिल्हातील नगर पालिका सदस्य निवडुण येतात तेव्हा त्यांचा वार्डाची लोकसंख्या जवळपास २००० ते २५०० किंवा या पेक्षा काही कमी जास्त असते तेव्हा त्यांना विधान परिषद सदस्य निवडून देण्याचे अधिकार आहेत. तसेच शासनाकडुन स्थापित करण्यात आलेल्या नगर पंचायती मध्ये निवडुण आलेले सदस्य यांचा वार्डात जास्ती जास्त २०० ते ५०० मतदान असतात त्यांना ही विधानसभा सदस्य निवडूण देण्याचे अधिकार शासनाकडून प्राप्त आहे. मात्र प.स.सदस्य जवळपास ८-१० हजार लोकसंख्या असलेल्या क्षेत्रातून सदस्य निवडून येतात. मात्र त्यांना निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला नसल्यामुळे प.स. सदस्यावर गदा आणण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे.
येणाऱ्या आगामी निवडणुकीत विधान परिषद सदस्य निवडणुकीत महाराष्ट्रातील पंचायत समिती अंतर्गत निवडुन आलेले सर्व पं.स. सदस्यांना विधान परिषद सदस्य निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावा अशी मागणी मोहाड़ी पं. समितीचे सभापती रितेश वासनिक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, आमदार व जिल्ह्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.