पो.स्टे. एमआयडीसी बोरी हद्दीमधील जुगार अड्डयावर धाड

– नागपुर ग्रामीण पोलीसांची कारवाई

नागपूर :- दिनांक ०५/०८/२०२४ रोजी पोस्टे एमआयडीसी बोरी येथील स्टाफ पोस्टे ह‌द्दीत अवैध चंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, पोलीस स्टेशन एमआयडीसी बोरी हद्दीतील सुकळी बेलदार येथील अब्दुल शेख यांचे किरायाचे मकानाचे बाजूला असलेल्या सार्वजनिक ठिकाणी मोकळ्या जागेत काही लोक ५२ तासपत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पोस्टे एमआयडीसी बोरी येथील स्टाफ यांना प्राप्त झाले वरून सदर स्टाफ यांनी सुकळी वेलदार येथील अब्दुल शेख यांचे किरायाचे मकानाचे बाजूला असलेल्या मोकळया जागेत सापळा रचुन छापा टाकुन आरोपी नामे १) शुभम प्रकाश  देशमुख रा. वार्ड क्र. ५ सुकळी २) रोहित माणिकराव चारोरकर रा. वार्ड क्र. ६ ३) करण जयसिंग मोहिते रा वार्ड नं. ६ ४) अमोल रामप्रसाद पटले रा. वार्ड नं. ६ चारही रा. सुकळी बेलदार एमआयडीसी बोरी हे जुगार खेळतांनी मिळून आले. एकुण ०४ जुगारी इसम यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन १) एक लाल रंगाची निळे पट्टे असलेली प्लास्टिकची चटई २) ५२ तास पत्ते ३) नगदी ५२००/- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपीतांविरूध्द पोलीस ठाणे एमआयडीसी बोरी येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे एमआयडीसी बोरी येथील ठाणेदार सपोनि राजीव कर्मलवार, पोउपनि खोत, पोना श्रीकांत गौरकर यांनी पार पाडली.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

Wed Aug 7 , 2024
नागपूर :- दिनांक ०६.०८.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०३ केसेसे मध्ये एकुण ०३ ईसमांवर कारवाई करून २,०७०/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार कायद्यान्वये ०१ केसमध्ये ०१ ईसमावर कारवाई करून रू. ३२०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण २.२६१ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com