अवैधरीत्या देशी दारूची वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध कारवाई

नागपूर :- पोस्टे खापरखेडा येथील स्टाफ पोस्टे ह‌द्दीत पेट्रोलीग करीत असता मुखबिरद्वारे माहिती मिळाली की, सर्व्हिस रोडने पिपळा डाग बंगला येथे होंडा अॅक्टीव्हा गाडी क्र. MH-49/CC-0751 ने दारूची अवैध वाहतुक होत आहे. अशा माहिती वरून आरोपी नामे- राहुल कवडू वरठी वय २८ वर्ष रा. हनुमान मंदीर जवळ वार्ड नं. ४ ता. सावनेर हा त्याची होंडा अॅक्टीव्हा गाडी क्र. MH-49/CC-0751 ने सर्व्हिस रोडने पिपळा डाग बंगलाकडे भरधाव वेगाने गाडी घेवुन जाताना दिसल्याने त्याची गाडी थांबविली असता अॅक्टीव्हा गाडीचे पायदान जवळ एका पांढऱ्या रंगाच्या नायलॉन पिशवीमध्ये ४८ निषा देशी दारू भिंगरी सत्रा नं. १ किंमती १६८०/-रू. अॅक्टीवा गाडी क्र. एम. एच ४९/सी.सी.-०७५१ किंमती ६०,०००/- रूपये असा एकुण ६१,६८०/- रूपयाचा मु‌द्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरूद्ध पोस्टे खापरखेडा येथे कलम ६५ ई, ६५ अ मदाका. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोस्टे खापरखेडा येथील ठाणेदार पोनि धनाजी जळक, सफौ विठ्ठल वंजारी, पो. अं. आशिष मेश्राम यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस स्टेशन सावनेर नागपुर (ग्रामिण) हददीमध्ये हरविलेले / गहाळ झालेले मोबाईल त्याचे मुळ मालकांना परत

Fri Aug 2 , 2024
सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर नागपुर (ग्रामिण) हददीमध्ये सन २०२३ ते २०२४ गहाळ झालेले विवो, रेअल मी, सॅमसंग, ओपो, रेडमी, टेकनो, कंपनीचे मोवाईल यांचा तांत्रीक पदधतीने शोध घेवून त्याचे मुळ मालक नामे १) तनुश्री गौरव ढोले रा. रामटेक २) लिना पवन पटेल रा. सावनेर ३) राधीका कमलाकर वैदय रा. पारडी नागपुर ४) सुमित माधवराव गायधने रा. नरसाळा खापा ता. सावनेर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com