शेतकऱ्यांनी धान बियाणे खरेदी करताना दक्षता घ्यावी-तालुका कृषी अधिकारी विजय नंदनवार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- धान बियाणे खरेदी करताना शुद्ध व दर्जेदार बियाणे मिळविण्यासाठी प्रत्येक शेतकरी प्रयत्नशील असतो .पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणांची अनुउपलब्धता व बोगस बियाणे यासारख्या संकटांना समोर जावे लागते .शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतीय बियाणे कायदा 1966 लागू करण्यात आला आहे.या कायद्यानुसार उच्च प्रतीचे, जातीचे उत्पादन व विक्री केले जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाण्यांची निवड करण्यापूर्वी कृषी विभागाशी संपर्क साधुन नवीन सुधारित व संकरित वाणांची माहिती घेऊन परवाना धारक विक्रेत्यांकडूनच बियाण्यांची खरेदी करावी असे आवाहन कामठी तालुका कृषी अधिकारी विजय नंदनवार यांनी केले आहे.

बियाण्याच्या पिशवीला बियाणे गुणवत्ता दर्शविणारी खुनचिट्ठी लावलेली असते ती नीट तपासून घ्यावी बियाण्यांच्या प्रकारानुसार खुनचिट्ठीचा रंगही वेगवेगळा असतो .पायाभूत बियाण्यासाठी पांढऱ्या रंगाची ,मूलभूत बियाण्यासाठी पिवळ्या रंगाची ,प्रमाणित बियाण्यासाठी निळ्या रंगाची व सत्यप्रत बियाणांसाठी हिरव्या रंगाची खुनचिट्ठी असते.त्यावर पिकाचे नाव,जात आणि प्रकार ,गट क्रमांक ,बीज परिक्षणाची तारीख ,उगवनशक्ती ,शुद्धतेचे प्रमाण,बियाण्याचे एकूण वजन ,विक्रेत्यांचे नाव व पत्ता ,बियाणे प्रमाणित करण्याच्या अधिकाऱ्यांची सही व हुद्दा नमूद केलेला असतो.

बियाण्याच्या पिशवीवर माहिती छापलेली असते ती वाचून व तपासून घ्यावी ,बियाण्याचे लेवलही तपासून घ्यावे बियाण्याची वैद्यता तपासनी दिनांकापासून नऊ महिने असते .बियाणे खरेदी करताना खरेदीची पक्की पावती घ्यावी ,त्यावर शेतकऱ्याचे नाव,पिकाचे नाव ,प्रकार, जात,प्लॉट नंबर,व विक्रेत्यांची सही इत्यादींची नोंद करून घ्यावी.पावतीवर छापील पावती क्रमांक असल्याची खात्री करून घ्यावी .पावतीवर शेतकऱ्यांची व विक्रेत्यची सही व अंगठा असल्याशिवाय पावती स्वीकारू नये बियाणे पिशवीवर असलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने बियाणे खरेदी करू नये .बियाण्यांची पिशवी तिन्ही बाजूने शिवलेली असावी तसेच वरील बाजूस प्रमानपत्रासह शिवलेली असावी .पिशवी फोडताना ती खालील बाजूने फोडावी जेणेकरून पिशवीवर असणारे लेबल व प्रमाणीकरण यंत्रणेची खुनचिट्ठी व्यवस्थित राहील.पिशवी फोडल्यावर त्यात काही बियाणे नमुना स्वरूपात शिल्लक ठेवावे सोबत खरेदी पावती व लेबल व खुनचिट्ठी जपून ठेवावी .पेरणीनंतर खुनचिट्ठीवरील प्रमाणापेक्षा उगवण क्षमता कमी आढळल्यास किंवा बियानात भेसळ आढळल्यास बियाणे निरीक्षकाकडे लेखी तक्रार करावी.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुधीर मुनगंटीवार यांच्या "आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया" या कॉफी टेबल बुक चे इंदौर येथे थाटात प्रकाशन

Fri Jun 9 , 2023
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासकार्यावर प्रकाश टाकण्याचा यशस्वी प्रयत्न मुंबई :- विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचा नऊ वर्षांचा कार्यकाळ अत्यंत यशस्वी आणि दिशादर्शक ठरला असून आर्थिक विकासाच्या बाबतीत भारत लक्षणीय प्रगती करणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या उल्लेखनीय विकास कार्याचा आढावा घेणारे वने, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी लिहिलेल्या कॉफी टेबल बुक चे प्रकाशन आज इंदौर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights