शहर स्वच्छतेसाठी नागरिक व कर्मचाऱ्यांनी केले श्रमदान

-“एक तारीख- एक तास- एक साथ” उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर :- नागपूर शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकेतर्फे सतत प्रयत्न केले जातात. शहर स्वच्छता हा मुख्य हेतू लक्षात घेऊन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला “एक तारीख- एक तास-एक साथ” हा उपक्रम नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येतो. यंदाही गुरुवार (ता.१) रोजी सकाळच्या सुमारास स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर शहर साकारण्यासाठी “एक तारीख- एक तास एक साथ” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. मनपाच्या दहाही झोन मध्ये कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत श्रमदान केले.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल नेतृत्वात प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला स्वच्छता कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार मनपाच्या दहाही झोन मधील विविध ठिकाणी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

यात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या सावरकर नगर, दत्त मंदिर, धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या फुटाळा तलाव (प्रभाग १६), वायूसेना नगर (प्रभाग १३), हनुमाननगर झोन अंतर्गत येणाऱ्या एमएसईबी मैदान, नवीन सुभेदार (प्रभाग ३२), धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या मेडिकल चौक (प्रभाग १७ ),नेहरूनगर झोन अंतर्गत येणाऱ्या सक्करदरा तलाव (प्रभाग ३० ),गांधीबाग झोन अंतर्गत येणाऱ्या जामा मशीद रोड, मोमीनपुरा (प्रभाग १८), सतरंजीपुरा झोन अंतर्गत येणाऱ्या म्हाडा कॉलनी (प्रभाग ०५) लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या मिनीमाता नगर जानकी नगर पाणीच्या टाकीजवळ (प्रभाग २४),आशीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या विनोबा भावे नगर गांधी पुतळा (प्रभाग ०७), मंगळवारी झोन अंतर्गत येणाऱ्या ॲलेक्सेस हॉस्पिटलच्या मागे ताज नगर (प्रभाग १०) येथे नागरिकांनी अस्वच्छ परिसराची साफसफाई करुन परिसर स्वच्छ केला.

रस्त्यावरील पालापाचोळा, ओला व सुका कचरा, झाडाच्या फांद्या आदी उचलून कचरा गाडीत टाकण्यात आले. तसेच स्वच्छ करण्यात आलेला परिसर पुन्हा अस्वच्छ होवू नये, लोक तिथे पुन्हा कचरा टाकू नये म्हणून त्या ठिकाणी संबंधित झोनचे सहायक आयुक्त यांच्या मार्फत जनजागृती करण्यात आली. यावेळी नागरिक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी या सर्वांनी स्वच्छतेसाठी श्रमदानाच्या या उपक्रमात सक्रियपणे सहभाग नोंदविला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

OCW ने ग्राहक सेवा आणि पारदर्शकता सुधारण्यासाठी प्रगत GIS वेब अप्लिकेशनचे केले अनावरण...

Thu Aug 1 , 2024
नागपूर :- ऑरेंज सिटी वॉटर (OCW) आपल्या सुधारित, क्लाउड-आधारित भौगोलिक माहिती प्रणाली (Geographic Information System) वेब अॅप्लिकेशनच्या प्रारंभाची घोषणा करत आहे, हे आमच्या नवकल्पना आणि ग्राहक सेवा अनुभव सुधारण्यासाठीच्या वचनबद्धतेतील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ग्राहकांचे समाधान लक्षात घेऊन तयार केलेली ही नवीन प्रणाली अत्यंत सुरक्षित आहे आणि याला इंटीग्रेट करणे सोपे आहे. यामध्ये सर्व भागधारकांना डिजिटल पेमेंट, संकलन कार्यक्षमता, तक्रार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!