माहेर लेकीसाठी कधीच परकं होत नसतं ! – सारंगपूर येथे महल्लेवाड्यात गुढी उभारताना राजश्री पाटील भावूक

यवतमाळ :- कोणत्याही मुलीची जडणघडण ही तिच्या माहेरीच होत असते. कालांतराने पती, सासर हे तिच्या आयुष्यात येत असतात. त्यानंतर माहेर आणि सासर अशा दोन्ही कुटुंबात प्रेमाचा आणि स्नेहाचा दुवा ही ‘लेक’च असते. सासरी प्रगती करताना लेकीसाठी माहेर कधीच परकं होत नसतं, असे भावोद्गगार यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील-महल्ले यांनी काढले.

राजश्री पाटील यांनी पती खासदार हेमंत पाटील यांच्यासमवेत आज मंगळवारी सकाळी नेर तालुक्यातील आपल्या जन्मगावी सारंगपूर येथील महल्लेवाड्यात गुढी उभारली. याप्रसंगी राजश्री पाटील महल्ले यांनी आई-वडिलांच्या प्रतिमेचे पूजन करून आशीर्वाद घेतले. येणारे मराठी नववर्ष हे सर्वांना सुख, समृद्धीचे आनंदाचे आणि आरोग्यादायी जावो, अशी प्रार्थना करून शुभेच्छा दिल्या. राजश्री व हेमंत पाटील यांनी यावेळी महल्लेवाड्यातील आप्तेष्टांचे आशीर्वाद घेवून गावकऱ्यांशी संवाद साधला. सारंपूरची लेक दिल्ली जिंकायलाय निघाल्याचा आंनद यावेळी गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. यावेळी ज्येष्ठांनी राजश्रीताईंच्या कर्तृत्वाचे कौतूक करून विजयी भव असा आशीर्वाद दिला.

यावेळी शिवसेना दिग्रस विधानसभा सहसंपर्क प्रमुख गौरव भाके, शिवसेना महिला जिल्हा आघाडी प्रमुख वैशाली प्रशांत माशाळ, नेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रशांत मासाळ, शिवसेना उप तालुका प्रमुख नितीन कांबळे तसेच महायुतीचे सर्व सदस्य व कार्यकर्ते युवा वर्ग, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

झंकार महिला मंडल ने किए जटाशंकर मंदिर को वाटर कूलर एवं मटके भेट

Tue Apr 9 , 2024
नागपूर :- झंकार महिला मंडल, डब्लूसीएल नागपुर द्वारा अनेक समाजोन्मुख कार्यों किए जाते रहे है। इस श्रृंखला में झंकार महिला मंडल ने दिनांक 08.04.2024 को नागपुर, सिविल लाइन में स्थित जटाशंकर मंदिर को वाटर कूलर एवं मटके भेट किए। इस वाटर कूलर और मटको के इस्तेमाल से मंदिर में आने वाले भक्ति गण को शुद्ध एवं ठंडे पेय जल की […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com