– पक्षाची वाटचाल अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार – बाळू पाटील कोहळे
वरूड :- गेल्या अनेक वर्षांपासून वरूड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पकड मजबूत करत, अविरत काम करणाऱ्या तरुण पिढीचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळू पाटिल कोहळे यांच्या कामाची पोचपावती म्हणून पक्षाने आता त्यांची महाराष्ट्र प्रदेश सदस्य पदी नियुक्ती केली असून, या संदर्भात पक्ष अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात प्रदेश अध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते बाळू पाटिल कोहळे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
वरूड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी राजकीय स्तरावर विविध पदांवर राहून, अनेक सामाजिक उपक्रम बाळू कोहळे यांनी पक्षाची स्थिती तालुक्यात मजबूत केली. अगदी कोरोना काळात गोर गरिबांना मोफत अन्न धान्य, लस यांसह अनेक कार्यक्रम राबवले. अनेक प्रश्नांना वाचा फोडली. पक्ष वाढवला त्यामूळे बाळू पाटील कोहळे यांच्या कार्याची दखल पक्ष अध्यक्ष अजित पवार यांनी घेत त्यांना पक्षात वरच्या पदावर बढती देण्याचा विचार करुन, मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्ष बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारणी सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल पटेल, आमदार देवेंद्र भुयार, आमदार अमोल मिटकरी, आमदार इंद्रनील नाईक, आमदार राजू कोरेमोरे, आमदार मनोहर चांद्रिकापुरे, आमदार राजेंद्र शिंगणे, संजय खोडके, वसंतराव घुईखेडकर यांनी बाळू पाटिल कोहळे यांचे अभिनंदन केले.
या नवीन जबाबदारी सह नव्या आव्हानांना पेलवत, आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्षाची वाटचाल अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांच्या सामान्य गरजा ते इतर महत्त्वांच्या प्रश्नांना, प्रदेश स्तरावर सोडवण्यासाठी भर देणार असल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य बाळू पाटिल कोहळे यांनी सांगितले.